paytm : गेल्या 3 महिन्यात पेटीएमला 482 कोटींचा फटका, युजर्सच्या संख्येत चांगली वाढ
गेल्या तीन महिन्या पेटीएम कंपनीला तब्बल 482 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कंपनीचा वार्षीक रेव्हेन्यूत वाढ होऊन तो 1086 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या तीन महिन्या पेटीएम कंपनीला तब्बल 482 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे पेटीएमचं नुकसान काही केल्या थांबायचं नाही नाही. मागील तिमाहीपेक्षा यातिमाहीत नुकसन वाढल्याचं पेटीएम कंपनीकडून सांगण्यात आलंय. मगील तिमाहीत कंपनीचं 3 76 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं ते वाढून आता 482 कोटी रुपयांवर गेलं आहे. जून महिन्याच्या तिमाहीच्या आधी कंपनीचं 436 कोटी रुपयांंचं नुकसान झालं होतं.
सप्टेंबरच्या तिमाहीत महसूलात वाढ
कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यूत वाढ होऊन तो 1086 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही वाढ वार्षिक 64 टक्के आहे. मागच्या वर्षीच्या समान तिमाहीत रेव्हेन्यू 663 कोटी रुपये होता. रेव्हेन्यू मध्ये नॉपेमेट अॅप आणि युपीआय पेमेंट वॉल्यूममध्ये 52 टक्के वाढ झाली आहे आणि वित्तीय सेवेतून, दुसऱ्या सेवांमधून रेव्हेन्यू तीनपटीपेक्षा जास्त वाढला आहे. पेटीएमने मागील महिन्या झालेल्या लीस्टींगनंतर पहिल्यांदा आपली कमाई सार्वजनिकरित्या सांगितली आहे.
कंपनीच्या युजर्सच्या संख्येतही मोठी वाढ
कंपनीची युजर्सची संख्या 33 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने दिले्या माहितीनुसान ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यू 1 लाख 95 हजार 66 कोटी आहे. जी वार्षिक आकडेवारीनुसार 107 टक्क्यांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्येही कंपनीच्या युजर्सच्या संख्येत वाढ कायम राहिली आहे. पीटीएमने सांगितल्या प्रमाणे युजर्स वाढण्याचा प्रयत्न कायम राहणार आहे. सप्टेंबरमध्ये महिन्याला ट्रांजैैक्टिंग युजर्स वार्षिक 33 टक्के वाढून 5.74 कोटींवर पोहोचले आहेत आणि ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर 6.3 कोटींसह 35 टक्के वाढ झाली आहे.