‘समीर दाऊद वानखेडे’, नवाब मलिक म्हणतात, फ्रॉड इथून सुरु होतो, समजून घ्या नेमकं काय?

| Updated on: Oct 25, 2021 | 11:14 AM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे. (pehchan kaun? nawab malik's new tweet)

समीर दाऊद वानखेडे, नवाब मलिक म्हणतात, फ्रॉड इथून सुरु होतो, समजून घ्या नेमकं काय?
nawab malik
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे. तसेच काही कागदपत्रेही ट्विट करून यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असंही म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही फोटो व्हायरल झाला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबतचे दोन ट्विट केलं आहे. पहिल्या ट्विटमध्ये मलिक यांनी वानखेडे यांचा सिंगल फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अत्यंत जुना आहे. अगदी तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर मलिक यांनी पैचान कौन? असा सवाल केला आहे.

दुसरं ट्विट आणि फर्जिवाडा

आज ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.

लग्नाचे फोटो व्हायरल

दरम्यान, मलिक यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच जण दिसतात. त्यात वानखेडेही आहेत. सोबत डॉ. शबाना कुरेशीही आहेत. त्या त्यांची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या फोटोच्या सत्यतेबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

मलिक गौप्यस्फोट करणार?

दरम्यान, मलिक यांनी लागोपाठ दोन ट्विट केले आहेत. आज दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन या ट्विटबद्दल अधिक खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

कोणकोणत्या पदांवर काम

2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

 

संबंधित बातम्या:

 शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई

RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी

‘कभी खुशी कभी गम’मधून डेब्यू ते ताईक्वांदोत सुवर्ण, NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी सर्वकाही

(pehchan kaun? nawab malik’s new tweet)