‘मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य’, बोहरा मुस्लीम समुदायाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचं भावनिक भाषण

पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते मरोळमध्ये अलजामिया-तूस-सैफिया संकुलाचं उद्घाटन झालं. यावेळी मी आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

'मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य', बोहरा मुस्लीम समुदायाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचं भावनिक भाषण
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 6:57 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वे ट्रेनचं उद्घाटन झालं. नरेंद्र मोदी यांनी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते मरोळ येथील कार्यक्रमात गेले. बोहरा मुस्लीम समाजाने मरोळ येथे कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी भावनिक भाषण केलं. विशेष म्हणजे त्यांच्याच हस्ते आज मरोळमध्ये अलजामिया-तूस-सैफिया संकुलाचं उद्घाटन झालं. यावेळी मी आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

“मी आपल्या परिवाराचा सदस्य आहे. मी इथे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नाही. मला जे सौभाग्य मिळालं आहे ते खूप कमी लोकांना मिळालं आहे. मी या परिवाराच्या चार पिढ्यांशी जोडलो गेलोय. इतकं मोठं भाग्य मला मिळालं”, असं भावनिक वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं.

“चारही पिढ्या माझ्या घरी आल्या आहेत. असं सौभाग्य खूप कमी लोकांना मिळतो. त्यामुळे तुमच्या चित्रफितमध्ये वारंवार माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय पंतप्रधान असं म्हटलं गेलंय, मी तर आपल्या परिवाराचा सदस्य आहे आणि प्रत्येक वेळी एका परिवाराचा सदस्य म्हणून समोर यायची जेव्हा वेळ आलीय तेव्हा आलोय. यामुळे माझा आनंद वाढला आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“वेळेनुसार परिवर्तन आणि विकासाच्या कसोटीवर बोहरा समितीने नेहमी स्वत:ला सिद्ध केलंय. आज अल जमिया सारख्या शिक्षण संस्थाचा विस्तार याचं एक जिवंत उदाहरण आहे”, असं मोदी म्हणाले.

“मी संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं अभिनंदन करतो. हे दीडशे वर्षापूर्वीचं स्वप्न साकार झालंय. बोहरा समजाचा आणि माझं नातं किती जून आहे हे कदाचित कुणी असेल त्याला माहिती नसेल. मी जगभरात कुठेही गेलो तरी प्रेमाचा वर्षाव माझ्यावर होतो”, असं मोदी यांनी सांगितलं.

मोदींकडून आठवणींना उजाळा

“मी सहेदना साहेब यांना सहज भेटण्यासाठी गेलो होते. ते वयाच्या 99 व्या वर्षी मुलांना शिकवत होते. माझ्या मनाला ती घटना आजही प्रेरित करते”, असं मोदी म्हणाले.

“नव्या पिढीला प्रशिक्षित करण्यासाठी सहेदना साहेबांचं काय कमिटमेंट होतं. वयाच्या 99 वर्षी बसून मुलांना शिकवणं केवढी मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे 800 ते 1000 विद्यार्थी होते. माझ्या मनाला ते दृश्य नेहमी प्रेरणा देतंय”, अशी आठवण त्यांनी दिली.

“गुजरातला राहून आम्ही एकमेकांना खूप जवळून पाहिलंय. अनेक रचनात्मक प्रयोगांना एकत्र मिळून काम केलंय”, असं मोदींनी सांगितलं.

“मला आठवतं सहेदना साहेबांचा शताब्दी वर्ष आम्ही साजरा करत होतो. सहेदना साहेबांनी मला विचारलं की काय काम करु? मी म्हटलं, मी कोण आहे तुम्हाला काम सांगणारा? पण त्यांचा खूप आग्रह होता”, अशी आठवण त्यांनी सांगितली.

“कुपोषणाच्या लढाई विरोधापासून जलसंवर्धनाच्या अभियानापर्यंत समाज आणि सरकार कसे एकमेकांची ताकद होऊ शकतात ते आम्ही एकत्र मिळून ते केलं आहे आणि त्याचा मी गौरव अनुभव करतो”, असं मोदी म्हणाले.

“सहेदना साहेबांसोबत काम करण्याची मला संधी आहे. त्यांचं मला मार्गदर्शन राहिलं आहे. मी जेव्हा गुजरातमधून दिल्लीला गेलो तरीपण ते प्रेम मला आजही मिळत आहे”, असं मोदी यांनी सांगितलं.

“इंदौरच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी जो स्नेह मला दिलं होतं ते माझ्यासाठी खूप अनमोल आहे. मी जगभरात कुठेही गेलो तिथे माझ्या बोहरा समाजाचे भाऊ-बहीण येतातच”, असं मोदी म्हणाले.

“आपलं प्रेम मला वारंवार आपल्यापर्यंत घेऊन आणतं. काही यशामागे अनेक दशकांचे स्वप्न असतात. मुंबई शाखेच्या रुपाने अल जमिया सैफियाचा विचार होत आहे तो अनेक दशकांपूर्वीचा आहे. त्यावेळी देश गुलामीत होता. शैक्षणिक क्षेत्रात एवढं मोठं स्वप्न पाहणं एक मोठी गोष्ट होती. पण जे स्वप्न चांगल्या विचारांनी पाहिले जातात ते यशस्वी होतात”, असं नरेंद्र मोदी या कार्यक्रमात म्हणाले.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.