‘आम्ही समुद्राला धडकू शकतो, लाटांनाही चिरु शकतो’, मोदींचं नवी मुंबईत धडाकेबाज भाषण

"देशाच्या माता-भागिनींच्या सशक्तीकरणाची गॅरंटी मोदी सरकारने दिली आहे. मी जी गॅरंटी दिली आहे त्याला महाराष्ट्राचं सरकार पूर्णत्वास नेत आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, नारीशक्ती एप्लिकेशन, आणि 1 लाखाची योजना असाच एक उत्तम प्रयत्न आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

'आम्ही समुद्राला धडकू शकतो, लाटांनाही चिरु शकतो', मोदींचं नवी मुंबईत धडाकेबाज भाषण
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 6:30 PM

मुंबई | 12 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी-नाव्हा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन झालं. या सेतूच्या उद्घाटनानंतर नवी मुंबई विमानतळाच्या मैदानावर मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी 35 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा पाढा वाचला. तसेच विकासकामांसाठी मोदी सरकार समुद्रालादेखील धडकू शकतं आणि लाटांनाही चिरु शकतं, असं नरेंद्र मोदी आपल्या आक्रमक शैलीत म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामांचं देखील कौतुक केलं. यावेळी त्यांनी महिला सशक्तीकरणाच्या योजनांविषयी माहिती दिली. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेकडो महिलांचे देखील आभार मानले.

“भारताच्या विकासासाठी आम्ही समुद्राला धडकू शकतो. लाटांनाही चिरु शकतो. आजचा कार्यक्रम संकल्पातून सिद्धी प्राप्त करण्याचं प्रमाण आहे. मी 24 डिसेंबर 2016 चा दिवस विसरु शकतो ज्यादिवशी मी अटल सेतूच्या भूमीपूजनासाठी आलो होतो. मी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन म्हटलं होतं की, देश बदलेल आणि पुढे सुद्धा जाईल. या व्यवस्थेत वर्षानुवर्षे काम लटकवण्याची सवय पडली होती. त्यामुळे नागरिकांना काहीच आशा उरलेली नव्हची. लोक विचार करायचे की त्यांच्या जिवंतपणी मोठे पुरस्कार होणं हे कठीण आहे. त्यामुळे मी सांगितलं होतं, लिहून ठेवा देश बदलणार. ही सर्व मोदीची गॅरंटी होती”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘भव्य भारताची इमारत बनतेय’

“मी आज छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा नमन करुन, मुंब्रा देवीला नमन करुन, सिद्धीविनायक देवाला वंदन करुन हे अटल सेतू मुंबईकर आणि देशाच्या जनतेला समर्पित करतोय. कोरोना संकट असतानाही या सेतूचं कामकाज सुरु राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासाठी लोकार्पण, उद्घाटन एक दिवसाचा कार्यक्रम नसतो, आमच्यासाठी प्रत्येक प्रोजक्ट भारताच्या नवनिर्माणाचा माध्यम आहे. प्रत्येक विटेने इमारत बनते तसंच अशा प्रोजेक्ट्समधून भव्य भारताची इमारत बनत आहे”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

“आज देशाच्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाचे 35 हजार कोटी विकासकामांचं लोकार्पण झालं. हे प्रोजेक्ट रोड, रेल्वे, मेट्रो, पाणी सारख्या सुविधांशी संबंधित आहे. बरेच प्रोजेक्ट तेव्हा सुरु झाले होते जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिनचं सरकार स्थापन झालं होत. देवेंद्र यांच्यापासून एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापर्यंतचा सर्व टीमच्या प्रयत्नांना हे यश आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘महिला कल्याण ही आमची प्रमुख गॅरंटी’

“मी महाराष्ट्राच्या सर्व माता-भगिनींचंही अभिनंदन करतो. देशाच्या माता-भागिनींच्या सशक्तीकरणाची गॅरंटी मोदी सरकारने दिली आहे. मी जी गॅरंटी दिली आहे त्याला महाराष्ट्राचं सरकार पूर्णत्वास नेत आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, नारीशक्ती एप्लिकेशन, आणि 1 लाखाची योजना असाच एक उत्तम प्रयत्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीसाठी भारताच्या नारीशक्तीने पुढे येणं, नेतृत्व करणं गरजेचं आहे. महिलांच्या कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या सर्व अडचणी कमी करण्याचा आणि त्यांचं जीवन सोपं करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. उज्ज्वला गॅस योजना असेल, आयुषमान योजनाअंतर्गत 5 लाख रुपयांच्या मोफत उपाचाराची सुविधा असेल, जनधन बँक खाते, पीएम आवासचे पक्के घर, घरांचं रजिस्ट्रेशन महिलांच्या नावाने व्हावं, गर्भवती महिलांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये पाठवायचे असोत, नोकरी करणाऱ्या महिलांना पगारासह 26 आठवड्यांची सुट्टी देणं, सुकन्या समृद्धी खाते योजनातून जास्तीत जास्त व्याज देणं, अशा अनेक योजनांतून आमच्या सरकारने महिलांच्या प्रत्येक चिंतेकडे लक्ष दिलं आहे. डबल इंजिन सरकार कोणत्याही राज्यात असो, महिला कल्याण ही आमची प्रमुख गॅरंटी आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.