AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | अजित पवार यांच्या अडचणी वाढणार? 10 नोव्हेंबरला मोठा फैसला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात अधिकाऱ्यांसोबत बैठकांता धडाका सुरु आहे. ते विकासकामांचा सातत्याने आढावा घेत आहेत. ते पुण्याचे पालकमंत्री झाल्यापासून पुण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. असं असताना आता त्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

Ajit Pawar | अजित पवार यांच्या अडचणी वाढणार? 10 नोव्हेंबरला मोठा फैसला
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 6:16 PM

ब्रिजभान जैसवार, Tv9 मराठी, मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी 10 नोव्हेंबरला निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव समोर आलं होतं. अजित पवार यांच्यावर या कथित घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. अजित पवार यांना या घोटाळ्याप्रकरणी आधी क्लिनचीट देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण आता कोर्टात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का? याचा फैसला आता 10 नोव्हेंबरला होणार आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणावर राज्य सरकारकडून तपास सुरु असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी महत्त्वाचे आदेश दिले. सुनावणीला गांभीर्याने घ्या, चालढकल करु नका, असे आदेश न्यायाधीशांनी केले. शिखर सहकारी बँकेत कथित 25000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावर विशेष पीएमएलए कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीने निर्णायक वळण घेतल्याची माहिती समोर आलीय.

कोर्टात नेमकं काय घडलं?

या घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असून क्लोजर रिपोर्ट रद्द करा, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत शालिनीताई पाटील आणि माणिकराव जाधव यांनी प्रोटेस्ट पिटीशन (निषेध याचिका) दाखल केल्याची माहिती समोर आलीय. सदर प्रकरणात सरकार तपास करत असल्याची माहिती सरकारच्या वतीने कोर्टात देण्यात आली.

या प्रकरणी आजच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश राहुल रोकडे यांची कठोर भूमिका घेतली. चालढकल न करता सुनावणीला गांभीर्यानं घ्या, असे निर्देश न्यायाधीशांनी दिले. याचिकाकर्त्यांची बाजू वकील सतीश तळेकर यांनी कोर्टात मांडली. या प्रकरणी 10 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होईल, असं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी सुनावणीवेळी अजित पवार अडचणीत येतील का? याचा फैसला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिखर बँक घोटाळा प्रकरण थोडक्यात समजावून सांगायचं म्हणजे या बँकेने अनेक सूत गिरण्या, सहकारी संस्था यांना बेहिशोबी कर्ज दिलं होतं. मात्र ते कर्ज वसूल न झाल्याने बँक डबघाईला आली. याप्रकरणी अजित पवार यांच्यासह अनेकांवर आरोप करण्यात आले होते. पण, तपासादरम्यान अनेकांना क्लीनचीट देखील मिळाली आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.