AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police : गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित, पवारांच्या घराबाहेरील राड्यानंतर मोठी कारवाई

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या आंदोलनानंतर त्या विभागातील पोलीस दलातही मोठ्या घाडमोडी घडत आहेत. शनिवारीच या झोनच्या डीसीपींची उच्चलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आता गावदेवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांना थेट निलंबीत करण्यात आलंय.

Mumbai Police : गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित, पवारांच्या घराबाहेरील राड्यानंतर मोठी कारवाई
पोलिसांबाबतची मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 8:54 PM

मंबई : शरद पवार यांच्या (St Woker Protest) घरावर झालेल्या आंदोलनानंतर त्या विभागातील पोलीस दलातही (Mumbai Police) मोठ्या घाडमोडी घडत आहेत. शनिवारीच या झोनच्या डीसीपींची उच्चलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आता गावदेवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर (Senior Police Inspector Rajbhar) यांना थेट निलंबीत करण्यात आलंय. आंदोलनानंतर साऊथ मुंबई कंट्रोल रुमला त्यांची बदली केली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार यांचं निवासस्थान सिल्व्हर ओक येथील एसटी कर्मचारी आंदोलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.  गृहमंत्र्यांकडे सादर अहवालानंतर दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. या झोनचे डीसीपी योगश कुमार यांना विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारीच हटवले होते. त्यांच्या ठिकाणी डीसीपी निलोत्पल यांना चार्ज देण्यात आला होता.

पोलीस खात्यावर अनेक सवाल

या आंदोलनावेळी पोलिसांना काहीच माहिती आधी कशी मिळाली नव्हती, पोलीस काय करत होते, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला होता. तसेच पोलीस यंत्रणा यावेळी सपशेल फेल झाल्याची टीका अनेक स्तरातून होत होती. गृह खातं राष्ट्रवादीकडे असल्याने आणि त्यांच्याच प्रमुख नेत्याच्या घरावर असे आंदोलन झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावरही अनेक सवाल उपस्थित झाले होते. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वजण पोलीस खात्याकडे बोट दाखवत होते. त्यामुळे आता तरी मुंबई पोलिसांना तातडीने पाऊलं उचलणं गरजेचं होतं, त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांवर धडाडीने कारवाई करण्यात आली आहे. या विभागातील पोलीस दलात आणखी काही मोठे बदल होण्याची शक्यता.

अहवाल आल्यानंतर कारवाई

हे आंदोलन झाल्यापासून पोलीस प्रशासनाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. राज्याची गुप्तचर यंत्रणा काय करत होती. या आंदोलनाबाबत पोलीस खात्याला कोणतीही कल्पना नव्हती. मात्र पत्रकार पोलीस खात्याच्या आधी तिथे दाखल झाले, तरी पोलीस खातं गाफील राहिलं असल्याची टीका सतत होत आहे. त्यामुळे दिलीप वळसे-पाटलांनी सुरक्षेत चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आधीच दिला होता. आता यात जसजसे अहवाल येतील तशा कारवाई होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आणखी किती जणांना हे प्रकरण भोवणार आहे. हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Breaking: पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं! यशोमती ठाकूरांचं मोठं विधान

एका क्षणात पवारांनी सत्तेचे चित्र पालटले; मी पुन्हा येईल म्हणणारे पहात बसले; खडसेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis : भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.