BREAKING | शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणात सर्वात मोठी घडामोड, दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांनी शीतल म्हात्रे यांच्या पाठलाग प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हे तरुण ठाकरे गटाशी संबंधित असल्याची देखील माहिती मिळत आहे.

BREAKING | शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणात सर्वात मोठी घडामोड, दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 8:55 PM

मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांना पाठलाग करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या दोन्ही कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. स्वप्नील माने आणि सागर चव्हाण अशी दोघांची नावे आहेत. दोघेही तरुण हे प्रभादेवी परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही माहीम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी आहेत. दोघांनी शीतल म्हात्रे दादर परिसरातून जात असताना त्यांना हातवारे केले आणि पाठलाग केल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी केली होती. त्याच प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

शीतल म्हात्रे यांच्या गाडीचा काही दिवसांपासून अज्ञात लोक पाठलाग करत असल्याचे त्यांच्या सुरक्षा रक्षकाला ही बाब लक्षात आली. विशेष म्हणजे दोन अज्ञात तरुणांनी बाईकवरुन शीतल म्हात्रे यांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप करण्यात आलेला. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी मुंबई पोलीस सहउपायुक्तांकडे तक्रार केलेली. त्यानंतर शीतल म्हात्रे यांनी आज दादर पोलीस ठाण्यात जावून जबाब नोंदवलेला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

तरुण हल्ला करण्याच्या तयारीत होते?

शीतल म्हात्रे आज दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या त्यावेळी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे सुद्धा त्यांच्यासोबत आले होते. पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे संशयित इसम हे हल्ला करण्याच्या तयारीत होते की काय? असं त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत होतं, असा दावा शीतल म्हात्रे यांनी केला. यावेळी शीतल म्हात्रे यांनी काल आपल्यासोबत घडलेला सर्व थरार सांगितला.

हे सुद्धा वाचा

“मी काल सहपोलीस आयुक्तांना भेटून पत्र दिलं होतं की, काल शिवाजी पार्क येथून मंत्रालयाच्या दिशेला जात असताना सिद्धिविनायक मंदिराजवळ एका बाईकवरुन दोन इसम माझा पाठलाग करत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर आमची गाडी वेगाने पुढे नेली. त्या इसमांचा इरादा आणि हावभाव योग्य वाटले नाही. त्यांची हल्ला करायची इच्छा आहे की काय? असं वाटत होतं. त्यामुळे मी त्याबाबतचं पत्र सहपोलीस उपायुक्तांना दिलं”, अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली.

“मी आज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला आलेली आहे. कारण पूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे मला खात्री आहे, पोलिसांना लवकरच आरोपी सापडतील. त्यामुळे त्या पद्धतीने मी माझा जबाब नोंदवलेला आहे. पोलीस त्या पद्धतीने कारवाई करतील”, असा विश्वास शीतल म्हात्रे यांनी वर्तवला.

मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.