येणारं सरकार महाविकास आघाडीचे; भाजपच्या वाटेवरील या बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ

Mahavikas Aaghadi : विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. बैठकाचं सत्र सुरू आहे. महायुती, महाविकास आघाडीतील पक्षांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली आहे. त्यातच आता भाजपच्या वाटेवरील या बड्या नेत्याने राज्यात महाविकास आघाडी सरकार येण्यासाठी बाप्पालाच साकडे घातले आहे.

येणारं सरकार महाविकास आघाडीचे; भाजपच्या वाटेवरील या बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ
महाविकास आघाडी सरकारसाठी गणरायाकडे प्रार्थना
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 12:29 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी काय समीकरणं असतील. तिथे कोण फोडता येईल याची महाविकास आघाडीने चाचपणीच नाही तर प्रयोग पण सुरू केले आहे. त्यामुळे महायुतीची अनेक मतदारसंघात डोकेदुखी वाढणार आहे. भाजपातील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू आहे. त्यांना थोपवून ठेवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. त्यातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या या बड्या नेत्याने मात्र एकच खळबळ उडून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी त्याने बाप्पालाच साकडे घातले आहे.

येणारे सरकार महाविकास आघाडीचे

येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे, तर फोडाफोडीच्या राजकारणाला पण जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार पुढचं येईल गणरायाकडेही मी साकडं घातलं आहे, असे वक्तव्य करुन एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजप पक्ष प्रवेशाचं भिजत घोंगडं

एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये यायचे आहे. पण त्यांचा अद्याप प्रवेश झालेला नाही. लोकसभेपूर्वीपासून ते भाजपमध्ये येण्याची तयारी करत आहे. याविषयीचा खुलासाच त्यांनीच अनेकदा केला. लोकसभा निवडणुकीनंतर ते दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले. तेव्हा त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानण्यात येत होता. त्यानंतर आता लखपती दीदी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव येथे आले. तेव्हा त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली. पण या कार्यक्रमाला साधं निमंत्रणही त्यांना पाठवण्यात आलं नसल्याचा आरोप खडसे यांनी केला. त्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी जाहीर केली.

भाजपमधील खानदेशच्या धुरंधरानी त्यांच्या पक्ष प्रवेशावर चिमटे काढल्यानंतर आता खडसे यांचा भाजपतील पक्ष प्रवेश बारगळल्याचे स्पष्ट झाले. तर खडसे यांनी सुद्धा एका मर्यादीत वेळेनंतर आपण राष्ट्रवादीचे काम जोरदारपणे करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एकूणच चित्र स्पष्ट झाले. येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे, तर फोडाफोडीच्या राजकारणाला पण जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार पुढचं येईल गणरायाकडेही मी साकडं घातलं आहे, असे त्यांचे वक्तव्य हे त्याचेच द्योतक वाटत आहे.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.