मुंबई म्हाडाच्या सोडतीत राजकारण्यांना ‘लॉटरी’
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या मुंबईतील लॉटरीत राजकारणी भाग्यवान ठरल्याचं उघड झालंय. शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला कोट्यवधी किंमतीचे दोन फ्लॅट लागले आहेत. त्याप्रमाणे खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परेल इथलं म्हाडाचं 99 लाखांचं घर लागलंय. रामदास कांबळे, शिवसेना नगरसेवक, सायन प्रतिक्षा नगर, तुंगा पवई येथे उच्च उत्पन्न गटात 99 लाखांचं घर लागलं. […]
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या मुंबईतील लॉटरीत राजकारणी भाग्यवान ठरल्याचं उघड झालंय. शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला कोट्यवधी किंमतीचे दोन फ्लॅट लागले आहेत. त्याप्रमाणे खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परेल इथलं म्हाडाचं 99 लाखांचं घर लागलंय. रामदास कांबळे, शिवसेना नगरसेवक, सायन प्रतिक्षा नगर, तुंगा पवई येथे उच्च उत्पन्न गटात 99 लाखांचं घर लागलं.
माजी आमदार आणि नगरसेवक अतुल शाह हे कांदिवली महावीर नगरमध्ये प्रतीक्षा यादीत आहेत. शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवक, आमदार, खासदारांना घर लागल्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. पण ही लॉटरी पारदर्शक पद्धतीने निघाली आहे. त्यामुळे शंका उपस्थित करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे.
मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. बिल्डरांपेक्षा कमी दरात घर मिळतं ही अपेक्षा म्हाडाकडून असते. म्हाडाच्या घरांच्याही किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण काही सवलतीत का होईना हक्काचं घर होईल याकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्यांऐवजी राजकारण्यांनाच लॉटरी लागली आहे. म्हाडाच्या 1384 घराची लॉटरी लागली. पण या घराचे खरे लाभार्थी ठरले ते राजकारणी.
विनोद शिर्के शिवसेना शाखा प्रमुख 5 कोटी 80 लाख आणि 4 कोटी 99 लाख किमतीचं कंबाला हिल ग्रांट रोड इथल्या धवलगिरी या इमारतीमधील दोन फ्लॅट लागले आहेत.
आमदार, खासदारांचा कोटा दोन टक्क्यांचा आहे. माजी आमदार, खासदारांचाही कोटा दोन टक्क्यांचा आहे. त्यामुळे आमदार, खासदारांना लागलेली घरं लॉटरी पद्धतीने लागली आहेत. शंका आहे त्यांनी म्हाडा कार्यालयात येऊन आणि म्हाडाच्या आयटी विभागाला भेट देऊन त्याच्या शंकेचं निरसन करून घ्यावं अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.