मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केले आहेत. मोदींच्या या निर्णयाचं देशभरातून स्वागत केलं जात आहे. शेतकऱ्यांनी जिलेबी वाटून या निर्णयाचा जल्लोष केला आहे. देशभरात जल्लोषाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून संसदेत घोषणा देत असतानाचा त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्या आणि सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी हा व्हिडीओ पोस्ट करून आज राजीजी असते तर आनंदी झाले असते, असं म्हटलं आहे.
प्रज्ञा सावत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर एक पोस्ट टाकली आहे. अंहकाराचा पराजय आणि सत्याचा आज विजय झाला. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. जनरेट्यापुढे फॅसिस्ट शक्तींचा पराभव झाला आहे. शेतकऱ्यांचं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. आज या शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजीव सातव राज्यसभेत लढले होते. त्यामुळे त्यांचे नेहमी स्मरण राहील, असं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं आहे.
अवघ्या 14 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. राज्यसभेत वेलमध्ये येऊन काँग्रेस खासदार घोषणाबाजी करत असताना या व्हिडीओत दिसत आहेत. तानाशीही मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद तानाशाही मुर्दाबाद… अशा घोषणा देताना काँग्रेस नेते दिसत आहेत. हा गोंधळ सुरू असतानाच राजीव सातवही याच घोषणा देताना दिसत आहेत. कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी काँग्रेस खासदार घोषणा देताना दिसत आहेत.
आम्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे म्हणून आणले. त्याचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं. पण शेतकऱ्याच्या एका गटाने त्याला विरोध केला. हे कायदे कसे त्यांच्या हिताचे आहेत हे समजावून सांगण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. पण त्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली देतानाच यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या अधिवेशनात ही कायदे रिपील करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं सांगतानाच शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये. त्यांनी आपआपल्या घरी जावं. शेतावर काम करावं, असं आवाहन मोदींनी केलं.
Today is the historic day when arrogance was shattered Truth has won
The power of masses has defeated the fascist forces
The sacrifice of the farmers will always be remembered
Victory of farmers RahulJi India
Remembering Rajeevji who fought for this cause in Rajya Sabha pic.twitter.com/zhwKcZgNCc— Dr Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) November 19, 2021
संबंधित बातम्या:
Modi Withdraws 3 Farm Laws LIVE | मोदींच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलन आजच संपणार नाही