अजित पवार यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी? प्रफुल्ल पटेल यांच्याकडून आतली बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.

अजित पवार यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी? प्रफुल्ल पटेल यांच्याकडून आतली बातमी
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 9:06 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ हे देखील दिल्लीला गेले आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप याबाबत तिढा सुटत नसल्याने अजित पवार दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या तिढ्यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत दाखल झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाल्यापासून दिल्लीत अजित पवार, माझी आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी यांच्यासोबत आमची भेट झालेली नव्हती. त्यामुळे आज एक औपचारिक भेट होणार आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसेच आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची औपचारिक भेट घेणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्ताने दिल्लीत आले आहेत. ते आमच्यासोबत कुठेही येणार नाहीत, असंही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही’

“मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. जवळपास सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. आजच्या भेटीत मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचे विषय चर्चेत येणार नाहीत. आम्हीसुद्धा टीव्ही पाहतोय. जे टीव्हीवर चाललंय तसं वास्तव्यात नाही”, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“काही खाते भाजप आणि शिवसेनेकडे आहेत. याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत काल रात्री सखोल चर्चा झाली आहे. याबाबत कोणताही वाद नाही. उद्या किंवा परवा तुम्हाला खातेवाटप झालेलं दिसेल”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

“केंद्राच्या विषयी आम्ही अजिबात चर्चा केलेली नाही. मुंबईच्या विषयी स्वभाविक आहे. कारण आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. आज औपचारिक एक भेट आहे. एक शिष्टाचार असतो, ज्यांच्याबरोबर आम्ही आलो त्यांच्यासोबत चहा तरी घ्यावा आणि औपचारिक भेट घ्यावी”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

‘पंतप्रधान मोदींना 18 तारखेला भेटणार’

“आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आता भेट होणार नाही. एनडीएची 18 जुलैला बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचं निमंत्रण मला आणि अजित पवार आम्हा दोघांना आलेलं आहे. आम्ही स्वभाविकपणे त्या बैठकीला हजर राहणार आहोत. तेव्हा आमची दोघांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होईल”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

‘राजपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये आमचाही समावेश असेल’

“आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आमचा वाटा असेल. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये आमचा वाटा असेलच”, असं पटेल म्हणाले. “आम्ही इथे कोणताही मुद्दा घेऊन आलेलो नाहीत. मुद्दे असतील तर आम्ही सरकारमध्ये का सहभागी झालो असतो? आम्ही एक राजशिष्टाचार म्हणून इथे आलो आहोत”, असंही पटेल यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझी भेट झाली. आमची काल भेट झाली. त्यावेळी आमची सविस्तर चर्चा झाली. सर्व गोष्टी क्लिअर आहेत”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

“सरकार आधीपासून स्थापन झालेलं आहे. त्यामध्ये आम्ही आता सहभागी झालो आहोत. खातेवाटप आधीच झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या मंत्र्यांकडे असणारे काही खाती आमच्याकडे येतील. तर त्या मंत्र्याला दुसरं कुठलं खातं द्यायचं हे काम होणार आहे. या कामाला दोन ते दिवस लागतातच. सर्व व्यवस्थित आणि चांगल्याप्रकारे सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात सर्व चित्र महाराष्ट्र आणि मुंबईत स्पष्ट होईल”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.