आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होणार? प्रकाश आंबेडकर यांनी आतली बातमी सांगितली

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Abedkar) यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला 'रोखठोक' कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष मुलाखत दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होणार? प्रकाश आंबेडकर यांनी आतली बातमी सांगितली
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 7:21 PM

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Abedkar) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला ‘रोखठोक’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. पुण्यात चिंचवडच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे नेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केलीय. महाविकास आघाडीत ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं ठरलेलं असताना कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. याच विषयी प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक वक्तव्य केलं.

चिंचवडच्या जागेवरुन महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांमध्ये जशी चर्चा व्हायला हवी होती, तशी झाली नाही. तसेच आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जमतं का? असा मोठा प्रश्न असल्याचं आंबेडकर स्पष्टपणे म्हणाले. त्यामुळे आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होणार की काय? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय-काय म्हणाले?

“मी मागच्या निवडणुकीत तीन वेळा राहुल कलाटे यांच्या सभेला जाऊन आलोय. मागच्या निवडणुकीत मी त्यांच्या प्रचाराला जाऊन आलोय. त्यामुळे राहुल कलाटे यांच्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितलं होतं की, कुणीतरी त्यांना स्वीकारा”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“उद्धव ठाकरे यांनाच चिंचवडचा तिढा सोडवावा लागणार आहे. आम्ही शेवटपर्यंत थांबणार आहोत. आमच्याकडून काहीच गडबड होणार नाही. हा गोल्डन पिरिअड आहे. या पिरिअडमध्ये जे काही घडवता येईल ते घडवलं पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात बैठका होऊन जी रणनीती आखली जाणं आवश्यक होतं ते हवं तसं झालं नाही, असं मला वाटतं. त्याचा अभाव मला दिसतोय. आता त्यांचंच तिघांचं जमतं की नाही? हाच मोठा इशू मला दिसतोय”, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

“मी आजही सांगतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही चौघं एकत्र आलो तर 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. असं घडू नये, पण शिवसेना आणि आम्हाला दोघांनाच लढवण्याची वेळ आली तर 150 पेक्षा कमी जागा येणार नाहीत”, असंदेखील मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

‘त्यावेळी शेवटच्या क्षणी भाजप आणि काँग्रेसची युती झालेली’

“मी 1985 साली पहिल्यांदा निवडणूक लढलो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आम्ही दोघं-तिघंच होतो की, त्यावेळी चार-पाच हजार मतांसाठी हरलो. त्यावेळेस काँग्रेसही वेगळी लढली, आम्हीदेखील वेगळो लढलो आणि भाजपही वेगळी लढली होती. त्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजप आणि काँग्रेसची युती झाली होती”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

“त्यावेळी प्रचार काय होता तर, मी निवडून आलो तर शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर हे मस्जिद होईल. त्या निवडणुकीच्या माध्यमातून माझा एवढा अभ्यास कुणाचाच झाला नाही. त्यामुळे ते काय-काय रणनीती आखू शकतात याबद्दल माझा एवढा अभ्यास जास्त नाही”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.