कोरोनाचा प्रादुर्भाव घटला, पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; आंबेडकरांची मागणी
नंदुरबार, धुळे, नागपूर, अकोला, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या आरक्षित जागा सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्या आहेत. (prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)
मुंबई: नंदूरबार, धुळे, नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. नंदुरबार, धुळे, नागपूर, अकोला, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या आरक्षित जागा सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूका होऊ घातल्या आहेत. ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पूर्ण होण्यापूर्वीच कोरोनाच्या कारणास्तवमध्येच थांबवण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या या पाच जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. तेव्हा ही प्रलंबित निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी आंबेडकरांनी या पत्राद्वारे केली आहे. आंबेडकर यांनी 9 ऑगस्ट मदान यांना पत्रं पाठवून ही मागणी केली आहे.
अकोल्यात जिल्हा परिषदेच्या 14, पंचायत समितीच्या 28 जागांसाठी प्रक्रिया
अकोला जिल्ह्यात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली होती. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार होते. अकोल्यात 14 जिल्हा परिषद व 28 पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता.
ऑनलाईन अर्ज मागवले होते
निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी ऑनलाईन अर्जही मागवले होते. अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 14 आणि सात पंचायत समित्यांच्या 28 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार होते. या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 29 जूनपासून सुरू करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार होते. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार होती. तर, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर करण्यात आली होती.
किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?
धुळे – 15 नंदूरबार – 11 अकोला – 14 वाशिम -14 नागपूर -16
नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
धुळे -30 नंदूरबार -14 अकोला -28 वाशिम -27 नागपूर -31 (prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 11 September 2021https://t.co/YOqfXp5vOt#SuperFastNews100 #SuperFast #FastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2021
संबंधित बातम्या:
Mumbai Sakinaka Case : मुंबई बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : वळसे-पाटील
(prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)