नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ते तपासण्याची गरज; प्रवीण दरेकर यांची हल्लाबोल
नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का हे तपासण्याची गरज आहे. तसेच एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. (pravin darekar criticizes minister nawab malik over his allegation on devendra fadnavis)
मुंबई: नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का हे तपासण्याची गरज आहे. तसेच एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. रोज ड्रग्ज घेतल्यावर नशाबाज जसे खोटेनाटे आरोप करतात तसेच रोज आरोप करण्याची नशा त्यांना लागली आहे. त्यातून देवेंद्र फडणवीसां त्यांनी आरोप केले आहेत. अमृता फडणवीस यांच्यासंदर्भातील वक्तव्यही त्यातूनच आले आहे. त्यांनी केलेले आरोप हे केवळ वैफल्यातून केल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. त्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नवाब मलिक यांचा चेहरा व देहबोली पाहिली तर ते वैफल्याने पूर्णपणे ग्रासलेले दिसत आहेत. म्हणूनच ते भाजप व भाजपच्या नेत्यांवर अशी बेताल वक्तव्य करत आहेत. अशाच प्रकारे त्यांनी अमृता फडणवीस मॅडम यांच्यावरही आज टीका टिप्पणी केली आहे. महिलांच्या संदर्भात व एखाद्याच्या कुटुंबियांवर टीका करताना त्यांची किळसवाणी प्रवृत्ती दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.
मलिक यांनी राजीनामा द्यावा
संविधानाच्या चौकटीमध्ये एखादा मंत्री मंत्रिपदाची शपथ घेताना मी कोणाशी द्वेष भावनेने वागणार नाही, असूया करणार नाही. जातीपातीच्या संदर्भात माझी भूमिका न्याय्य असेल, अशी शपथपूर्वक सांगतो, ही संविधानाची चौकट आहे. पण या सगळ्या चौकटींचे उल्लंघन नवाब मलिक यांच्याकडून होत आहे. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा केविलवाणा अट्टहास सुरू आहे. ते दलित आहेत की मुस्लिम आहेत हे सिद्ध करण्याचा प्रकार आता पर्यंत कधीच झाला नव्हता. हे त्या पदाला शोभा दणारे नाही. त्यामुळे मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
तर राजकीय जीवानातून संन्यास घेईन
मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. या आरोपात एक टक्का पण तथ्य असल्यास मी राजकीय व सामाजिक जीवनातून संन्यास घेईन. तथ्य नसल्याच मलिक यांनी यांच्या कुटुंबाची माफी मागावी, असं भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. मलिक महाष्ट्रातील जनतेची दिशाभुल करण्या करता प्रशासकीय अधिकारी तसेच नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मलिक यांनी फडणवीस यांच्या कुटुंबावर जे आरोप केले आहेत खूप निंदनीय असून त्यात तत्थ्य नाही. महाराष्ट्रातील 10 करोड जनतेला देवेंद्र यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप विश्वास व अभिमान आहे. महाराष्ट्र भ्रष्ट्राचार व अत्याचाराने झोडपला गेला आहे, याकडे दुर्लक्ष करून मलिक दुसऱ्यावर आरोप करण्यात आपला वेळ घालवत असल्याचा आरोपही लोढा यांनी केला.
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 1 November 2021 https://t.co/21U0Dwt9M3 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2021
संबंधित बातम्या:
मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार: नवाब मलिक
पाटणा गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरण, चौघांना फाशी, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा
‘इंधन दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खाच्या बातम्यांवर जोर’, सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार
(pravin darekar criticizes minister nawab malik over his allegation on devendra fadnavis)