राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आरक्षण टिकलं नाही; प्रविण दरेकरांचा टोला

महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास सुरू आहे. आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे आरक्षण टिकवता आले नाही, असा टोला प्रविण दरकेर यांनी लगावला.

राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आरक्षण टिकलं नाही; प्रविण दरेकरांचा टोला
Pravin Darekar
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 5:07 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास सुरू आहे. आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे आरक्षण टिकवता आले नसून मराठा समाजाला आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित रहावे लागले. त्यांना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे, हा सरकराचा नाकर्तेपणा असल्याची टिका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरकेर यांनी केली. (Pravin Darekar says Maharashtra Govt passing time on Maratha reservation, because of them Community is deprived from reservations)

शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याची मोहीम आखली आहे. मेटे यांनी जनजागृती मोहिमेअंतर्गत मुंबईत सायन ते सी. एस. टी अशी मोटारसायकल रॅली काढली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, तसेच कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते.

मराठा आरक्षण मोटारसायकल रॅलीत माध्यमांसोबत बोलताना दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास सुरू आहे. एखादा समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आणि त्यांना पाठिंबा देणारे, नेतृत्व करणाऱ्या जनतेला आदळआपट करत आहेत अस बोलायचं आणि दुसऱ्या बाजुला बोलताना संघर्ष नको संवाद साधा, असंही म्हणायचं. परंतु सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही संवाद साधला जात नाही. त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही घेणंदेणं नाही, असा टोला दरकेर यांनी यावेळी लगावला.

मराठा आरक्षणावरून राज्यभरात रानं पटलं आहे. आंदोलनं झाली, लोक रस्त्यावर उतरली आहेत. सरकर मात्र मलिदा खाण्यात व्यस्थ आहे असा आरोप दरेकरांनी केला. पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका, मराठा समाजाच्या चिंगारीचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही. वणवा पेटण्याआधी मुख्यमंत्र्यांनी जाग व्हावं. भाजप, केंद्र, फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा या अधिवेशनात मराठा समजाला न्याय देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, असेही दरेकर म्हणाले.

इतर बातम्या

जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही? प्रवीण दरेकरांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

(Pravin Darekar says Maharashtra Govt passing time on Maratha reservation, because of them Community is deprived from reservations)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.