भाजप नेत्याच्या मेहुण्याला एनसीबीनं का सोडलं, अधिकारी म्हणतात, जाती, धर्माच्या आधारावर काम करत नाही!
एनसीबी ही एक प्रोफेशनल संस्था आहे. आम्ही कोणत्याही जाती, धर्म आणि पक्षाच्या आधाराने काम करत नाही. आम्ही पुराव्याच्या आधारे काम करतो, असं एनसीबीने आज स्पष्ट केलं. (Procedure unbiased, allegations false and baseless, says NCB)
मुंबई: एनसीबी ही एक प्रोफेशनल संस्था आहे. आम्ही कोणत्याही जाती, धर्म आणि पक्षाच्या आधाराने काम करत नाही. आम्ही पुराव्याच्या आधारे काम करतो, असं एनसीबीचे डेप्युटी डीजी ग्यानेश्वर सिंग यांनी आज स्पष्ट केलं. भाजप नेत्याच्या मेव्हुण्याला का सोडण्यात आलं? असा सवाल करण्यात आला असता त्यावर एनसीबीने हे उत्तर दिलं.
एनसीबीनचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ पार्टीवरील कारवाईबाबतची माहिती दिली. आम्ही 8 लोकांना पकडलं आणि तिघांना सोडलं असं सांगितलं जात होतं. पण आम्ही 6 लोकांना सोडलं आहे. एनसीबी ही एक व्यावसायिक संस्था आहे. आम्ही जात, धर्म, पक्ष पाहून काम करत नाही. पुराव्याच्या आधारे आम्ही काम करतो. न्यायालयाच्या सुपरव्हिजनमध्ये काम करतो, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.
भानुशाली, गोस्वामीला ओळखत नव्हतो
8 लोकांना अनेक ड्रग्ज सोबत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यात दोन स्वतंत्र साक्षीदार लागतात. वास्तविक वेळेच्या आधारावर ऑपरेशन होत असतं. यावेळी 9 साक्षीदार होते. त्यात मनिष भानुशाली आणि केपी गोस्वामी होते. या सर्व साक्षीदारांना एनसीबी यापूर्वी ओळखत नव्हती, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं.
आरोपींच्या वकिलांचाही आमच्यावर विश्वास
या रेडमध्ये ज्या लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर या लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. जेवढ्या लोकांना ताब्यात किंवा अटक केली त्यांच्याशी आम्ही चांगला व्यवहार केला. त्यांच्या वकिलांनीही आमच्यावर विश्वास दाखवला आहे. एकूण 14 लोकांना एनसीबीच्या कार्यालयात आणलं होतं. सर्वांचा तपास केला आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. तसेच 14 पैकी 8 लोकांना अटक केली. तर सहा लोकांना पुराव्या अभावी सोडण्यात आले. ज्या लोकांना एनसीबीने अटक केली होती. त्यांना आधी एक दिवसाची त्यानंतर चार दिवसाची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. बाकी लोकांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मलिक यांचे आरोप काय?
युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते, असे मलिक म्हणाले.
प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेले होते. 1300 लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री 12 तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी 11 लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं, अशी मागणी मलिक यांनी केली होती.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 October 2021 https://t.co/IYnP9ZfALa #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
संबंधित बातम्या:
(Procedure unbiased, allegations false and baseless, says NCB)