AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर खळबळ माजली होती. यानंतर संपूर्ण मंत्रालायाची तपासणी करण्यात आली आहे. Email of bomb Planted in Mantralaya

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं
मंत्रालय
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 7:15 AM

मुंबई: मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर खळबळ माजली होती. यानंतर संपूर्ण मंत्रालायाची तपासणी करण्यात आली आहे. धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. (Pune Police taken into custody one person for sending email of bomb Planted in Mantralaya in Mumbai)

मेल करण्याचं कारण काय?

मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही. या कारणामुळे म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला, असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरु

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या  शैलेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे यानं  पाठवलेला मेल सांयकाळी 6.20 ला  प्राप्त झाला होता अशी माहिती आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

महिनाभरात दुसरी घटना 

राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब (Bomb) ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरातील तरुणाचा खोडसाळपणा

दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत मंत्रालयाकडे; दूध दरवाढीसाठी अनोखं आंदोलन

(Pune Police taken into custody one person for sending email of bomb Planted in Mantralaya in Mumbai)

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.