जिथे पूर आला तिथेच कोरोनाचं मोठं संकट घोंगावतंय? मुख्यमंत्र्यांचा 6 जिल्ह्यांना थेट अलर्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करत आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, विविध जिल्ह्यांमधील निर्बंध, राज्यातील महापुरानंतरची परिस्थिती या विषयांवर ते राज्यातील जनतेशी बोलत आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करत आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, विविध जिल्ह्यांमधील निर्बंध, राज्यातील महापुरानंतरची परिस्थिती या विषयांवर ते राज्यातील जनतेशी बोलत आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात जिथे पूर आला तिथेच कोरोनाचं मोठं संकट घोंगावतंय. असे म्हणत त्यांनी पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना थेट इशारा दिला आहे. (Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Satara, Sangli and Kolhapur districts are at greater risk of corona, CM’s direct alert)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये पूर येऊन गेला, तिथे कोरोनाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. पूर येण्यापूर्वीदेखील प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. सध्यादेखील या जिल्ह्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोव्हिड-19 बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. येथील जनतेने बेसावध राहून चालणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांसह पुणे सोलापूर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांनादेखील कोरोनाचा धोका आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची दररोज नोंद होत आहे. येथील शहरं आणि ग्रामीण भागातील परिस्थितीत तफावत असू शकते. परंतु या जिल्ह्यांच्या प्रशासनाने आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आपण ‘कोरोनामुक्त गाव’ यासारखे उपक्रम राबवतोय. मी, तसेच प्रशासन गावांमधील सरपंचांशी संपर्क करत आहोत. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे अनेक गावं कोरोनामुक्त झाली आहेत. अशाच पद्धतीने आपण कोरोनाला हद्दपार करण्यात यशस्वी होवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
महापुरादरम्यान प्रशानाने चार लाख नागरिकांचं स्थलांतर केलं
ज्या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आपल्याला धडकलं. यावेळी तौत्के चक्रीवादळ आपल्या किनाऱ्याला स्पर्श करुन गेलं. परंतु त्याने करायचं तेवढं नुकसान केलंच. त्यानंतर जो काही पूर आला ते सगळं विचित्र होतं. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस एका दिवसात आणि काही तासात कोसळायला लागला. याची काही कारणं आपण काहीही देऊ शकतो. वेधशाळेने याचा अपल्याला अंदाज दिला होता. पण तो इतक्या भीषण राहील असं कुणाला माहिती नव्हतं. काही ठिकाणी धरणाचं पाणी कमी करावं लागलं. त्यामुळे नद्यांना पूर आला. आता हे दरवर्षाचं संकट, त्यातून येणारी आपत्ती. त्यातल्या त्यात अतिवृष्टीचा इशारा सांगितल्यानंतर आपल्या प्रशासनाने जवळपास साडेचार लाख लोकांचं स्थलांतर केलं. आपण जीवितहानी होऊ दिलं नाही. मात्र, ज्या दरडी कोसळल्या त्यात आपले रस्ते खचले. तसेच घाटही खचले. तसेच दरडी कोसळून गावं उद्धवस्त झाली. डोंगराच्या खाली आपले बांधव, मात-भगिनी गाडल्या गेल्या. दरडी कोसळणे, पूर येण्याचे प्रामाण वाढू लागले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळणार आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल, असं म्हटलं जातंय.
इतर बातम्या
(Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Satara, Sangli and Kolhapur districts are at greater risk of corona, CM’s direct alert)