Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider : सीमा हैदर हिला मनसेचा थेट इशारा, ऐकलं तर ठीक, अन्यथा राडा तर होणारच

आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? असा संतप्त सवाल...

Seema Haider : सीमा हैदर हिला मनसेचा थेट इशारा, ऐकलं तर ठीक, अन्यथा राडा तर होणारच
MNS AMEY KHOPKAR
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 5:18 PM

मुंबई । 13 ऑगस्ट 2023 : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सीमा हैदर ही पाकिस्थानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून तिची चौकशी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे तिच्या प्रेमकथेवरुन चित्रपट बनविण्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली आहे. ‘कराची ते नोएडा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. मात्र, हा सिनेमा येण्याआधीच निर्मात्यांना अनेकांकडून धमक्या आल्या आहेत. त्यात आणखी एका धमकीची भर पडली आहे. खळखट्याकफेम राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने सीमा हैदर यांना थेट धमकी दिली आहे.

पाकिस्तानातून नेपाळमार्गे सीमा हैदर भारतात आली. सीमा आणि सचिन दोघेही ग्रेटर नोएडामधील एका गावात राहतात. त्या दोघांनी मार्च महिन्यात नेपाळमध्ये लग्न केले. आपण आपला धर्मही बदलला असा दावा सीमा हैदर करत आहे.

हे सुद्धा वाचा

सीमा आणि सचिन नेपाळला लग्न करून भारतात आल्यानंतर सतत चर्चेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत आहेत. चित्रपट निर्माते अमित जानी यांनी कराची ते नोएडा या चित्रपटाची घोषणा केली. त्याचे नोएडामध्ये शूटिंगही सुरू झाले आहे. त्याचे ऑडिशन सीनही व्हायरल होत आहेत.

PUBG खेळता खेळता त्याची प्रेमकथा झाली. सीमा भारतात कशी आणि का आली? हे आम्ही आमच्या चित्रपटामांडून सांगत आहोत. त्याबद्दल प्रत्येक माहिती आम्ही गोळा करत आहोत, असे चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सांगितले होते.

निर्माते अमित जानी यांना या चित्रपटावरून अनेक जणांनी धमक्या दिल्या आहेत. तर, आता मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून सीमा हैदर हिला इशारा दिला आहे. असे नाटक थांबवा, अन्यथा मनसेकडून कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा त्यांनी दिलाय.

‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? असा संतप्त सवाल खोपकर यांनी केला आहे.

हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर, राडा तर होणारच..असा गंभीर इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता मनसे या प्रकरणी कोणता निर्णय घेणार हे पाहणारे महत्वाचे आहे.

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.