AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 ऑगस्टला शांतता राखा, ईडी ऑफिसबाहेर जमू नका, राज ठाकरेंचं आवाहन

ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्टला शांतता पाळा, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.

22 ऑगस्टला शांतता राखा, ईडी ऑफिसबाहेर जमू नका, राज ठाकरेंचं आवाहन
| Updated on: Aug 20, 2019 | 3:27 PM
Share

मुंबई : ईडीने बजावलेल्या नोटिसीचा आदर करुया, 22 ऑगस्टला शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरवरुन मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज ठाकरे यांना ‘कोहिनूर’ प्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. राज ठाकरे यांना चौकशीसाठी 22 ऑगस्टला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याविरोधात मनसेने शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर हजर राहून शांततेत आंदोलन करण्याच्या तयारीत होते.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या (ईडी) नोटिसीचा देखील आदर करु. इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे. म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा.’ असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

राज ठाकरेंचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का?

‘सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.’ असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्यास सांगितलं आहे.

‘माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये.’ अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली आहे.

‘या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.’ असा इशाराही शेवटी राज ठाकरेंनी दिला आहे.

“लोकांनी आतापर्यंत आपल्या आवाजाची ताकद बघितली, आता आपल्या शांततेची ताकद दाखवून द्या. 22 तारखेला सर्वांनी ईडी कार्यालयाजवळ इथे उपस्थित राहा. पण शांततेत सर्व झालं पाहिजे”, असं बाळा नांदगावकर आधी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.

या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.

आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.

वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

संबंधित बातम्या :

स्पेशल रिपोर्ट – किणी ते कोहिनूर : 23 वर्षात राज ठाकरेंची कोणकोणती चौकशी?

Unmesh Joshi | ईडीच्या नोटीसमध्ये भेटायला या एवढंच आहे : उन्मेष जोशी

आतापर्यंत आवाज पाहिला, आता शांततेची ताकद दाखवू, मनसेचं 22 ऑगस्टला शक्तीप्रदर्शन

नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे

चूक नाही तर घाबरता का? कायदा हाती घेतला तर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री

ED आणि CBI या तपास यंत्रणा आहेत की मोदी-शाहांचे कार्यकर्ते? : राजू शेट्टी

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस

राज ठाकरेंना ED नोटीस, मनसे एक्स्प्रेस वे रोखणार, ठाणे बंदचाही इशारा

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.