Raj Thackeray Birthday | “तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय…”, बाळा नांदगावकर, संजय राऊतांसह राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा पाऊस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (Raj Thackeray Birthdays Wishes).
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (Raj Thackeray Birthdays Wishes). मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी न येता आहे तेथे सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांना मदत करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दरवर्षी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी येणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची काहीशी निराशा पाहायला मिळणार आहे.
बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवर राज ठाकरेंना शुभेच्छा देताना “सुदामाचे राजधन” या शिर्षकाखाली आपली भावना व्यक्त केली. तसेच त्यांच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “सुदामाची ओळख ही जगाला कृष्णप्रेमामुळे आहे. सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाले तरी सातत्याने लोक अजूनही देत असतात. सुदामाकडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते. तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते राज ठाकरे यांच्यामुळेच आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांना देण्यासारखे म्हणजे माझी “निष्ठा” जी मी कधीच अर्पण केली आहे.”
“सुदामाचे राजधन”
सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) June 13, 2020
“मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे. राज ठाकरेंचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे “राजधन”. योगायोग असाही आहे की राज ठाकरेंच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा “कृष्णकुंज”च आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे राज ठाकरेंना राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची प्रेमळ भेट होणार नाही. त्यामुळे सर्वांच्या मनात यावर्षी एकच ओळ नक्की असणार आहे, ‘साहेब प्राण तळमळला’. पण हा दुरावा तात्पुरता असून राज ठाकरे आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करुन जनतेच्या हिताचे काम करु. आज राज ठाकरेंच्या जन्मदिनी मी एकच सांगेन “तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए,” असंही बाळा नांदगावकर यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटलं.
वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र pic.twitter.com/IfV32Cfac6
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 14, 2020
शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत ट्विट केलं. यात त्यांनी म्हटलं, “वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले.असे व्यंगचित्रकार. रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
दरम्यान, कोरोनामुळे यंदा राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला जाणार नाही. राज ठाकरे यांनी स्वतः मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यंदा शुभेच्छा देण्यासाठी घरी न येता आहात तेथेच सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांना मदत करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे दरवर्षी कृष्णकुंजवर होणारी मोठी गर्दी यावेळी दिसणार नाही.
संबंधित बातम्या :
Aaditya Thackeray | नको हार-तुरे, नको केक, राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही मोठा निर्णय
Raj Thackeray | राज ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांना आवाहन
व्हिडीओ पाहा :
Raj Thackeray Birthdays Wishes