CM Eknath Shinde: आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका, एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करताना राज ठाकरेंचा सजगतेचा इशारा

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्याला मनापासून आनंदही झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांना का इशारा दिला आहे याचीच चर्चा होत आहे.

CM Eknath Shinde: आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका, एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करताना राज ठाकरेंचा सजगतेचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 9:30 PM

मुंबईः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (Chief Miister Eknath Shinde) म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरून (Social Media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असंख्य जणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावरून नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनीही एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे, मात्र त्यामध्ये त्यांनी आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका असा इशाराही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.

मनापासून अभिनंदन आणि इशाराही

सोशल मीडियावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांनीही त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. मात्र अजून त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेकडून अजूनही कोणत्याही प्रकारचे त्यांचे अभिनंदन करण्यात आले मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्याला मनापासून आनंदही झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांना का इशारा दिला आहे याचीच चर्चा होत आहे.

ट्विटची चर्चा

बंडखोरी नाट्यनंतर ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले आहे त्याबाबतही बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक प्रकारचा इशाराही दिला आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नशिबाने तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असली तरी ती तुम्ही स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती, मात्र पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मात्र जोरदार चर्चा झाली. त्याचवेळी राज ठाकरे यांच्याही ट्विटची चर्चा झाली.

सावधपणे पावले टाका

राज ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले असले तरी त्यांना त्यांच्या ट्विटमधून एकनाथ शिंदे यांना इशारा देत त्यांना आपण बेसावध राहू नका सावधपणे पावले टाका असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.