Raj Thackrey gudipadwa Teaser: राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर आला, बाळासाहेबांची हुबेहुब कॉपी?

राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. मात्र यावेळी बोलता बोलता राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर (Mns Teaser) आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असे थेट संकेत दिले होते.

Raj Thackrey gudipadwa Teaser:  राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर आला, बाळासाहेबांची हुबेहुब कॉपी?
राज ठाकरेंचं आजचं भाषण वादळी ठरणार, टार्गेट कोण?Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 8:33 PM

मुंबई : येणाऱ्या गुढी पाडव्याची (Gudipadwa) सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. त्यातल्या त्यात मनसैनिकांना राज ठाकरेंच्या (Raj Thackeray Speech) तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या वेळी वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. मात्र यावेळी बोलता बोलता राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर (Mns Teaser) आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असे थेट संकेत दिले होते. त्यामुळ या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजकीय सभांवर काही मर्यादा आल्याने राज ठाकरे नावाची नेहमी धडाडणारी तोफ काही काळ थंड होती. मात्र आता कोरोनाही कमी झाल्याने सण साजरे करायला थोडीफार मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे शिवतिर्थावर पुन्हा राज ठाकरेंची थोफ विरोधकांना घायळ करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मनसेच्या टिझरची चर्चा

गुढी पाडव्याचं भाषण वादळी ठरणार

गुढी पाढव्याच्या भाषणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक छोटासा टिझरही बनवण्यात आला आहे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिकसह पुण्यातला राज ठाकरेंचा बाईट लावण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे म्हणतात, आज हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर 2 एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाढव्याला, असा आवाज त्याला देण्यात आला आहे. सोबतच टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल-ताशांचा आवाजही देण्यात आला आहे. हा टिझर बाहेर आल्यापासून याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. यावर कमेंट आणि लाईक्सचाही पाऊस पडतोय. या टिझरने राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुक्ता आणखी वाढवली आहे. गुढी पाडव्याचं भाषण तुफानी होणार एवढं सांगयला हा टिझर पुरेसा आहे.

शिवतिर्थावर टार्गेट कोण?

राज ठाकरेंनी गेल्या भाषणावेळी भाजप पासून ते शिवसेनेच्या संजय राऊतांपर्यंत सर्वांचा समाचार घेतला होता. एवढच काय राज ठाकरेंनी पुण्यातल्या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही सोडलं नव्हतं. त्यामुळे आता गुढी पाडव्याच्या भाषणात मेन टार्गेट कोण अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सहाजिक काही दिवसात मुंबई महापालिकेसह काही मोठ्या महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी राज ठाकरेंनी आधीत दौऱ्यांचा आणि बैठकांचा सपाटा लावला आहे. मुंबई महापालिक लढवण्यासाठीही जोरदार तयारी सुरू केली आहे. बोरीवलीत त्यांनी बोलताना यावेळी विरोधकांना हाणायचं म्हणजे, हाणायचं म्हणतं स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे हे भाषण वादळी ठरणार एवढं मात्र नक्की.

BJP MVA: भाजपचे ‘सेंट्रल’ हल्ले ठाकरे सरकारच्या पथ्यावर? जेवढे जास्त हल्ले तेवढी आघाडी मजबूत होतेय? समजून घ्या 5 मुद्यांच्या आधारे

Fuel Prices in Maharashtra: राहुल गांधींनी मोदींना ‘अफगाणिस्तान’ दाखवला, भाजपच्या नेत्यांनी मग त्यांना ‘महाराष्ट्र’ दाखवला, पेट्रोल-डिझेल वॉर सुरु

Osmanabad PHOTO | भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे दगड फेकले त्याचे ‘आप’नं फुलं केली, केजरीवालांच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रात तऱ्हा न्यारी

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.