Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, दुसरं टार्गेट शरद पवार

| Updated on: Apr 02, 2022 | 11:11 PM

Raj Thackeray LIVE : आज गुढी पाडव्याचा (Gudipadwa melava) सण, प्रत्येक मराठी माणसासाठी हा सण खास असतो. त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी (Mns Gudipadwa melava) हा सण आणखीच खास असतो. कारण मनसेच्या गुढीपाढव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचं करारी भाषण होत.

Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, दुसरं टार्गेट शरद पवार
राष्ट्रवादीने जातीवाद पसरवला-राज ठाकरेImage Credit source: tv9

मुंबई : आज गुढी पाडव्याचा (Gudipadwa melava) सण, प्रत्येक मराठी माणसासाठी हा सण खास असतो. त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी (Mns Gudipadwa melava) हा सण आणखीच खास असतो. कारण मनसेच्या गुढीपाढव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचं करारी भाषण होत. राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाकडेही (Raj Thackeray Live) सर्वाचं लक्ष लागलं होतं.  गेल्या वेळी पुण्यात मनसेचा वर्धापण दिन पार पडला. त्यामुळे पुण्यातून राज ठाकरेंनी विरोधकांना कडकडीत इशारा दिला होता. माझं आजचं वर्धापण दिनाचं भाषण म्हणजे केवळ ट्रेलर आहे. खरा पिक्चर गुढी पाडव्याल शिवतिर्थावर तुम्हाला बघायला मिळेल, असे म्हणत राज ठाकरे गारा बरसतात तसे विरोधकांवर बरसले होते. आज तर राज ठाकरेंनी महाविकास आगाडीला थेट टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही खरपूस समचार घेतला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Apr 2022 09:05 PM (IST)

    फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

    राज ठाकरे सत्य बोलत आहेत

    मी सभा पूर्ण ऐकली नाही

    पण तुम्ही सांगताय तसे बोलले असतील तर सत्यच आहे

    सर्वात मोठा पक्ष बाहेर राहिला मात्र तीन पक्ष एकत्र येऊन लोकांची फसवणूक करत आहेत

  • 02 Apr 2022 08:55 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    तुम्ही जोपर्यंत घरी यांना बसवत नाही तोवर बदल होणार नाही

    उद्या मी बेफिकरीने वागलो तर खाली बसवा

    वचक हा जनतेचा असला पाहिजे

    शिवरायांचे अनुयायी म्हणून वागताना समाज सुधारला पाहिजे

  • 02 Apr 2022 08:53 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    मुख्यमंत्र्यांवर राज ठाकरेंचा थेट निशाणा

    मलाही ईडीची नोटीस आली गेला ना मी

    आता संपत्ती जप्त यांची करायला सुरू केली तेव्हा जाग आली

    आता मुख्यमंत्री बोलतात आता मला अटक करा

    बाळासाहेबांच्या नावाखाली काहीही करत आहे

    बाळासाहेबांचा फोटो लावून हजारो कोटी लूटत आहेत

    बाळासाहेबांचं स्मारक बांधायचे असेल तर मोठं बांधा

    तुम्हाला बंगला आवडा म्हणून घेऊ नका

    रात्री सगळी तिकडेच असतात, परदेशी गाडी तिकडे लागतात

  • 02 Apr 2022 08:51 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील

    अन्यथा डबल आवाजाचे स्पिकर लावू

    प्रत्येकाने धर्म घरामध्ये ठेवावा

  • 02 Apr 2022 08:47 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    आपल्याला गरजच नाही पाकिस्तानची

  • 02 Apr 2022 08:45 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या घरातही कट दिसला का?

    हल्ली हे कट वर चालतात

    मग ईडीने कट केला, मग मुख्यमंत्री संतापले

    यशवंत जाधव यांच्या घरात दोन दिवस रेड चालली

    मोजत काय होते

    आजकाल घरचे सांगत नाहीत यशवंत हो, बोलतात यशवंत जाधव हो

  • 02 Apr 2022 08:42 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    शहरात पुन्हा झोपडपट्ट्या वाढत होत्या

    बाळासाहेब थोरातांचा फुकट घरं देण्याचा उद्देश चांगला होता

    मात्र मुंबईत फुकट घर मिळतंय म्हणून बाहेरच्यांची गर्दी वाढली

    गरिबांना घरं मिळाली पाहिजेत

    साला आमदारांना कसली घरं वाटताय

    आमच्या राजू पाटीलने पहिलं घर नाकरलं

    मग आपण आमदारांची फार्महाऊस घेऊ आणि मग घर देऊ

    आमदारांची पेन्शन बंद केली पाहिजे

    आता कोणत्या आमदाराने घर मागवलं होतं, मग मुख्यमंत्र्यांना काय झालं?

  • 02 Apr 2022 08:38 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    मुघल आपलं काहीच हिरावून घेऊ शकले नाहीत

    प्रत्येक राज्याने आपलं राज्य मोठं केल्यास देश मोठा होईल

    हिदू मोठा होईल, पण एका राज्याला दुसरं राज्य ओरबडायचं आहे

    आमच्याच लोकांचं आपल्या लोकांकडे लक्ष नाही

  • 02 Apr 2022 08:34 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    जेम्स लेन जन्माला आला

    मग त्या भिकारड्याने पुस्ताकात काहीही लिहलं

    राष्ट्रवादीच्या जन्माआधी तो कुठे होता

    बाबासाहेब पुरंदरेंना मुद्दाम टार्गेट केलं जातं

    बाहेरील संबंध नसणारी लोकं काहीही बोलतात

    जातीपातीतून आपण बाहेर येत नाही

    हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत

  • 02 Apr 2022 08:31 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे

    शरद पवारांना ही गोष्ट आहे

    राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीवाद वाढला

    आधी जात जातीचा अभिमान होता, राष्ट्रवादीने जातीय वाद पेटवला

  • 02 Apr 2022 08:24 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    नवाब मलिक जेलमध्ये जाऊनही सत्तेत आहेत

    बदल हला असेल तर हे चालणार नाही

    रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये, असा कारभार असावा

    राज्यात सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे

    एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेना

    शेतकरी आत्महत्या थांबेना

    शिक्षणाची दुरावस्था सुरूच

    नोकरीत पहिलं प्राधान्य हे मराठी माणसाला मिळालंच पाहिजे

    बाकीचे नको इथे

  • 02 Apr 2022 08:19 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक जेलमध्ये

    पहिला मंत्री छगन भुजबळ जाहीर केला

    ते दोन वर्षे जेलमध्ये होते

    हे सगळं नकावर टीच्चून केलं जातं

    नवाब मलिक जेलमध्ये गेले तरी अंगठा दाखवत आहेत

  • 02 Apr 2022 08:18 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    तुम्हाला भरकटवलं जातं

    त्या बॉम्बच्या गाडीचं उत्तर अजूनही मिळत नाही

    त्यानंतर कमिशनरला काढून टाकलं जातं

    त्यानंतर तो म्हणतो गृहमंत्र्यांनं शंभर कोटी मागितले

    आणि आपण केवळ बघत बसतो

    रोज नवीन कायतर काढतात

  • 02 Apr 2022 08:16 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    रोज मीडियासमोर यांची पकपक सुरू

    मूळ विषय बाजुला नेला जातो

    सचिन वाझे शिवसेनेत होता

    असा माणून जिलेटीन ठवतो

    सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवलं

    हे सहज होतं का?

  • 02 Apr 2022 08:13 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    अजित पवारांचा राज ठाकरेंकडून नक्कल

    पाहटेच्या शपथविधीवरून खिल्ली उडवली

    असा प्रकार कुठेही पाहिला नाही

    व्यासपिठावर शिव्या घालता आणि पुन्हा मांडवर बसता

    आणि खोटी कारणं सागता

    मतदारांनी युती म्हणून तुम्हाला मतदान केलं

    राष्ट्रवादीसोबत जायला मतं नाही दिली

  • 02 Apr 2022 08:12 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    आधी जाहीर सभेत का नाही बोलला

    अमित शाह यांच्याशी एकांतात का बोलला?

    चार भिंतीत का गोष्टी केल्या?

    अमित शहा यांनी असे बोलणे झाले नसल्याचे सांगितले

    मग पाहटे उठून पाहतो  तर जोडा वेगळात

    पळून गेले एकाबरोबर आणि लग्न कुणाबरोबर कळेनाच

  • 02 Apr 2022 08:10 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    गेली निवडणूक आठवा

    सोबत कोण होतं आणि विरोधात होतं

    निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला

    अडीच अडीच वर्षे ठरली होती

  • 02 Apr 2022 08:07 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    दोन वर्षात मोरी जाम तुंबलीय

    शक्य होईल तितकं आज साफ करु

  • 02 Apr 2022 08:04 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा

    साडेसहा वाजल्यापासून मी तयार होतो

    सगळी सांगत होते की अजून लोक येत आहेत

    त्यामुळे यायला उशीर झाला

    आलेल्या सगळ्या सैनिकांचं दर्शन घेताना अभिमान वाटतोय

  • 02 Apr 2022 07:59 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात

  • 02 Apr 2022 07:52 PM (IST)

    Raj Thackeray live : राज ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले

    काही मिनिटात राज ठाकरे बोलणार

    राज ठाकरे थेट व्यासपीठावर दाखल

  • 02 Apr 2022 07:49 PM (IST)

    Raj Thackeray live : बाळा नांदगावकर Live

    बाळा नांदगावकर यांच्या भाषणाला सुरूवात

    कोणत्याही क्षणाला राज ठाकरे येतील

    या राज्याला राज ठाकरेंची गरज आहे

    तिघांचे सरकार आहे, त्यात एकमेकांचं पटत नाही

    वेगवेगळी विचारधारा, वेगवेगळी दिशा

    गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं पटत नाही

    मंत्र्यांचं आपसात पटत नाही

    त्यामुळे राज्याचा विकास होईना

  • 02 Apr 2022 07:43 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे आमदार राजू पाटील Live

    मनसे आमदार राजू पाटील यांच्या भाषणाला सुरूवात

    लोक मन की बात ऐकत असतील नसतील, मात्र मनसेची बात नक्की ऐकतात

  • 02 Apr 2022 07:39 PM (IST)

    Raj Thackeray live : राज ठाकरे काय बोलणार?

    राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष

    राज्यात सध्या घाणेरडे राजकारण सुरू-बाळा नांदगावकर

    राज ठाकरेंना लोकांच्या समस्यचे जाण-बाळा नांदगावकर

  • 02 Apr 2022 07:36 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसेचे शिवतीर्थावर मोठं शक्तिप्रदर्शन

    कोरोनाकाळात लोकांना राज ठाकरेंचा आधार मिळाला

    राज ठाकरेंनी अनेकांच्या समस्या सोडवल्या

    लोक मातोश्रीवर नाही तर कृष्णकुंजवर जायचे

    मनसेच्या नेत्यांकडून जनतेला साद

  • 02 Apr 2022 07:33 PM (IST)

    Raj Thackeray live : काही वेळात राज ठाकरे शिवतीर्थावर

    राज ठाकरेंना लवकरच आयोध्येला येण्याचे निमंत्रण

    शिवतीर्थावर हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

    काही वेळातच राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात होणार

  • 02 Apr 2022 07:31 PM (IST)

    Raj Thackeray live : काही वेळात राज ठाकरे शिवतीर्थावर

  • 02 Apr 2022 07:27 PM (IST)

    Raj Thackeray live : काही वेळात राज ठाकरे शिवतीर्थावर

    शर्मिला ठाकरे शिवतीर्थावर पोहोचल्या

    राज ठाकरेंची मनसैनिकांना प्रतीक्षा

    वादळी भाषणासाठी हजारो मनसेसैनिक दाखल

  • 02 Apr 2022 07:24 PM (IST)

    Raj Thackeray live : अमित ठाकरे शिवतीर्थावर दाखल

    काही वेळातच राज ठाकरेही पोहोचणार

    मनसेचं जोरदार शक्तिप्रदर्शन

    आज मनसेचा पुन्हा नवा निर्धार

  • 02 Apr 2022 07:23 PM (IST)

    Raj Thackeray live : राज ठाकरेंचं वादळी भाषण

    शिवतीर्थावर जोरदार जल्लोष सुरू

    सनई चौघडे वाजू लागले

    प्रतीक्षा राज ठाकरेंच्या भाषांची

  • 02 Apr 2022 07:12 PM (IST)

    Raj Thackeray Live : हजारो कार्यकर्ते शिवतिर्थावर दाखल

    काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी बाल्कनीतून मनसेसैनिकांना अभिवादन केले

    हजारो कार्यकर्ते पार्कवर दाखल

    मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, मनसेची टॅगलाईन

  • 02 Apr 2022 07:05 PM (IST)

    Raj Thackeray Live : काही मिनिटीत राज ठाकरेंचं भाषण

    राज ठाकरेंच्या भाषणाआधी मनसेचा ट्रेलर

    आजच्या पिक्चरमध्ये विलन कोण?

    राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार

  • 02 Apr 2022 07:01 PM (IST)

    Raj Thackeray Live : इथं राज ठाकरेंचं भाषण लाईव्ह पाहा

  • 02 Apr 2022 06:51 PM (IST)

    Raj Thackeray Live : शिवतिर्थावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार यासाठी संपूर्ण मनसैनिकांचे लक्ष सभेवर लागले आहे

    मात्र प्रत्यक्ष शिवतीर्थावर जाण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणे,पालघर,भिवंडी ,कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई कडून शेकडो बसेस आणि खाजगी वाहनांनी मुंबईत दाखल झाले आहेत

  • 02 Apr 2022 06:22 PM (IST)

    शर्मिला ठाकरे यांची सभेवर प्रतिक्रिया

    राज ठाकरे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार

    आम्हाला गर्दीची चिंता नाही

    हा गुढीपाडवा उत्साहाचा आणि जल्लोषाचा आहे

    कारण करोनाचे सगळे निर्बंध उठले आहेत

    दोन वर्षानंतर मनसैनिकांना भेटणार आहोत

  • 02 Apr 2022 06:19 PM (IST)

    Raj Thackeray यांनी दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे व सौ.शर्मिला राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पाडव्यानिमित्ताने गुढी उभारली. यावेळी मनसे नेते श्री.अमित राज ठाकरे व सौ.मिताली अमित ठाकरे यांनीही गुढीचे पूजन केले व शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या.

  • 02 Apr 2022 06:15 PM (IST)

    Raj Thackeray यांच्या सभेसाठी कार्यकर्ते शिवतिर्थावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी वसई विरार मधून शेकडो मनसे सैनिक दादरच्या दिशेने रवाना झाले आहे. विरार मनवेलपाडा, कारगील नगर, चंदनसार, नालासोपारा पूर्व-पश्चिम, वसई वालीव, गोखीवरे या परिसरातून मनसे कार्यकर्ते गेले आहेत. काहीजण बस तर काहीजण लोकलने गेले आहेत.

  • 02 Apr 2022 06:12 PM (IST)

    MNS च्या मेळाव्याची जबरदस्त तयारी

    मुंबईत मनसेच्या मेळाव्याची जय्यत तयारी

    राज ठाकरेंच्या भाषणासाठी स्टेज सजला

    मनसैनिकांना उत्सुकता राज ठाकरेंच्या भाषणाची

  • 02 Apr 2022 06:05 PM (IST)

    मुंबईत मनसेची भव्य बाईक रॅली

    आज पुन्हा शिवतिर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार

    काही वेळातच राज ठाकरेंचं भाषण होणार

    मनसेचा मंच सजला

Published On - Apr 02,2022 6:02 PM

Follow us
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.