‘आप लोगन से बिनती करात बा…’; मुंबईत मनसेची उत्तर भारतीयांना साद, भोजपुरी बॅनर्सची चर्चा

मनसेने हिंदुत्त्वाचा अजेंडा आत्मसात केल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत पाहायला मिळणारा हा बदल अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे. | MNS Bhojpuri banners

'आप लोगन से बिनती करात बा...'; मुंबईत मनसेची उत्तर भारतीयांना साद, भोजपुरी बॅनर्सची चर्चा
उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 1:07 PM

मुंबई: एकेकाळी परप्रांतीयांविरोधात रान उठवणाऱ्या आंदोलनांमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आता चक्क मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबईच्या कांदिवली परिसरात भोजपुरी भाषेत बॅनर्स लावण्यात आले आहे. मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात मनसैनिकांनी अनेक उत्तर भारतीयांना चोप दिला होता. मात्र, आता त्याच मनसेकडून उत्तर भारतीयांना साद घातली जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसेने हिंदुत्त्वाचा अजेंडा आत्मसात केल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत पाहायला मिळणारा हा बदल अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे. (Raj Thackeray MNS Bhojpuri banners in Mumbai)

कांदिवली परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनर्सच्या माध्यमातून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जय श्री राम … हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, अशा ओळी या बॅनर्सवर पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु झाली होती. यानंतर घाटकोपर परिसरात नागरिकांना पक्षात सामील होण्याचे आव्हान करण्यासाठी मनसेने गुजराती भाषेत बॅनर्स लावले होते. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती.

मनसेच्या बॅनर्सवर काय लिहले आहे?

जय श्री राम …हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, महाराष्ट्र की उन्नति और हिंदुत्व की बुलंद आवाज…हर हिन्दू की लड़ाई लड़ने वाले योद्धा आपन हिन्दू जननायक श्री राजसाहेब ठाकरे के साथ पूरी ताकत के साथ जुडेके बा, हमहू ई अभियान से जुडल बा, आप लोगन से बिनती करात बा, आप लोग भी ई मंगल अभियान से जुड़ जाई, और पूरे महाराष्ट्र के भगवा रंग में बदल देइ…..

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर मुंबईतील बोरिवलीत या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर केला गेला. यामुळे त्यावर मनसेने काही चिठ्या चिटकवण्यात आल्या. ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अशाप्रकारचे मजकूर लिहिण्यात आले होते. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांसाठी गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट, मनसे आमदारांची थेट गुजराती समाजाच्या कार्यक्रमास हजेरी

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी

घर मराठी माणसालाच विका, ‘आपलं ठाणे, मराठी ठाणे’, मनसेचे पोस्टर्स

(Raj Thackeray MNS Bhojpuri banners in Mumbai)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.