‘बाळासाहेबांसोबतची ती भेट शेवटची होती’, राज ठाकरे यांचा हृदयस्पर्शी व्हिडीओ, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसे स्थापनेआधी बाळासाहेब ठाकरेंच्या झालेल्या शेवटच्या भेटीचा किस्स्याचा व्हिडीओ शेअर केलाय.

'बाळासाहेबांसोबतची ती भेट शेवटची होती', राज ठाकरे यांचा हृदयस्पर्शी व्हिडीओ, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 11:51 PM

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जयंतीनिमित्त ठाकरे गट (Thackeray Group), मनसे (MNS) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्हिडीओद्वारे अभिवादन केलं. ठाकरे गटानं आमदार फुटीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक भाग शेअर केला. फडणवीसांनी बाळासाहेबांच्या विचारांचे वारस कोण? हे सांगितलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसे स्थापनेआधी बाळासाहेब ठाकरेंच्या झालेल्या शेवटच्या भेटीचा किस्स्याचा व्हिडीओ शेअर केला. बाळासाहेब ठाकरेंच्या 96 व्या जयंतीनिमित्त अनेकांनी व्हिडीओंद्वारे अभिवादन केलं. यात सर्वाधिक चर्चेत राहिला राज ठाकरेंनी ट्विट केलेला व्हिडीओ. शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा शेवटचा प्रसंग राज ठाकरेंनी या व्हिडीओतून सांगितलाय.

जेव्हा राज ठाकरेंची शिवसेनेत घुसमट होऊ लागल्याच्या बातम्या बाहेर येत होत्या. तेव्हा सुरुवातीला शिवसेनेनं त्या फेटाळून लावल्या. त्यावरुन बाळासाहेब ठाकरेंनी एका सभेत नेहमीच्या शैलीत मिश्किल भाष्य केलं होतं.

हे सुद्धा वाचा

मात्र शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले आणि मातोश्रीबाहेरच्या भाषणात माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांशी आहे, हे राज ठाकरेंचं वाक्य त्यावेळी खूप गाजलं.

ठाकरे गटाकडूनही व्हिडीओ शेअर

दुसरीकडे ठाकरे गटानं जर शिवसेनेतून आमदार फुटले तर काय करावं? असं आवाहन केलेला बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर केलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देताना एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय.

बाळासाहेब ठाकरे आज सर्व पक्षांना हवे आहेत. खासदार संजय राऊत म्हणतात की ठाकरेंकडची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.

शिंदे गटाच्या दाव्यानुसार तेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहेत. राज ठाकरे म्हणतात की त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचार पुढे न्यायचे आहेत. आणि भाजप म्हणतं की विचारांचं नातं हेच बाळासाहेबांशी खरं नातं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.