VIDEO: राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. (raj thackeray to visit ayodhya in diwali)

VIDEO: राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय
raj thackeray
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 12:06 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत.

कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी त्यांचं सपत्नीक स्वागत केलं. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावेळी जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं. तसेच अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज यांना करण्यात आली. राज यांनीही हे निमंत्रण स्वीकारलं आहे. राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णयही घेतल्याचं सांगितलं आहे.

जगतगुरू सूर्याचार्यजी स्मृतीस्थळावर

दरम्यान, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतिर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी राज यांची भेट घेतली.

राज यांच्यावर टीका

परप्रांतियांचा मुद्दा अज्ञानातून कांचनगिरी मां यांनी काल उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरून राज यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी ती भूमिका अज्ञानातून घेतल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

राज हिंदुत्वाकडे?

दरम्यान, राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचं महंतांना आश्वासन दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज यांच्या या नव्या भूमिकेमुळे मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याचे संकेतही मिळत आहेत.

भगवं पोस्टर

दरम्यान, गेल्यावर्षी मनसेच्या पहिल्या अधिवेशनानिमित्त मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आलं होतं. ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं होतं. सेनाभवनासमोर गुहे भव्य पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर मनसे पुढची वाटचाल करणार का? याबाबत चर्चा सुरु झाली होती.

संबंधित बातम्या:

Chhagan Bhujbal | …म्हणून अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही, हे सरकार मजबूत राहणार : छगन भुजबळ

Kirit Somaiya | अजित पवारांनी स्वत:चा कारखाना विकत घेतला, माझ्याकडे घोटाळ्याचे सगळे पुरावे

Nitesh Rane | गांज्यावर इतकं प्रेम बरं नाही, सामनावरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

(raj thackeray to visit ayodhya in diwali)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.