Raj Thackeray : राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

राज ठाकरे हे जे काही भडकाऊ भाषण करत आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 7:59 PM

मुंबईः मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Duri) यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानंतर मनसेच्या नेत्यांच्या संकटात वाढ होताना दिसून येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल

राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रीय अध्यक्ष इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या हेमंत पाटील यांच्यावतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

हिंदूना भडकावण्याचे काम

हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे हे ठाणे, मुंबई या ठिकाणी हिंदूना भडकावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडून ही गोष्ट करण्यात येत असल्याने ही घटना नियमबाह्य असून संविधानाला धरुन नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक सलोखा बिघडला

राज ठाकरे हे जे काही भडकाऊ भाषण करत आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व पोलिसांचे धन्यवाद

राज ठाकरे यांच्या भडकावू भाषणामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हिंदू मुस्लिम वाद होण्याची शक्यताही होती, मात्र मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यात वाद झाले नाहीत. राज्य शांत ठेवल्याबद्दल आणि समाजात कोणतीही दुही माजवली गेली नाही त्याबद्दल हेमंत पाटील यांनी सर्व पोलिसांचे धन्यवाद मानले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.