Rajyasabha Election : आम्हा भेदरले बोलतता तर त्यांची भादरलीय का? ट्रायडंटमधून संजय राऊतांचा भाजपला संतप्त सवाल
महाविकास आघाडी आमदार फुटतील म्हणून घाबरली आहे. त्यांना त्यांच्याच आमदारांवर विश्वास राहिला नाही, अशी टीका सतत होत आहे. त्यालाही आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : राज्यात सध्या अनेक हायव्होल्टेज घडामोडी घडत आहेत. मुंबईल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची तसेच अपक्ष आमदारांची बैठक (Mahavikas Aghadi Meeting) बोलावली आहे. या बैठकीला अनेक अपक्ष आमदार पोहोचले आहेत. राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणातले अनेक बडे नेतेही या बैठकीत दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था ही सध्या मांजरीच्या पिल्लांसारखी झाली आहे. या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून या ठिकाणी, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली होती. तसेच महाविकास आघाडी आमदार फुटतील म्हणून घाबरली आहे. त्यांना त्यांच्याच आमदारांवर विश्वास राहिला नाही, अशी टीका सतत होत आहे. त्यालाही आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तुमची भादरली आहे का?
शिवसेना घाबरली आहे अशी टीका सतत भाजपकडून होत आहे, त्यावर बोलतना संजय राऊत म्हणाले, ताज मध्ये काय चाललंय त्यांचं? आम्हाला भेदरले बोलत आहेत तर भाजपवाल्यांची भादरली आहे. चार संजय असते तर ते चारही जिंकले असता दावाही यावेळी राऊतांनी केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षावर कसाला विश्वास ठेवताय, आत्मविश्वास गमावलेली ती लोक आहेत. तुम्ही कितीही अपक्ष लोकांना भेटा तरी आमची काही हरकत नाही, दहा तारखेला बघून घेऊ, असा इशाराही यावेळी राऊतांनी दिला आहे.
भाजपकडूनही विजयाचा दावा
तर कितीही मोर्चेबांधणी करावी आमचा उमेदवार निवडणून येणार. आमदारांना कोंडून मत घेणं म्हणजे लोकशाहीवर विश्वास नाही. अपक्ष आमदार सोडून जातील म्हणून त्यांना कोंडून ठेवलं जातं. अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय ? अपक्षांनी सरकार चालवण्यासाठी पाठिंबा दिलाय. अपक्ष स्वतंत्र असलेले आहेत. माणसं कोंडली तरी मत कोंडली जाणार नाहीत, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. तर रोज ते संध्याकाळी हॉटेल बदलतात. मांजराच्या पिल्लांसारखी आमदारांची अवस्था झाली आहे. या घरातून त्या घरात नेत आहेत, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे आता यावरून महौल गरमागरमीचा झाला आहे. राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत राजकीय वातावारण हे असेच राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवासांत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.