आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उचलले महत्त्वाचे पाऊल
मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maratha reservation rally Mumbai)
कोल्हापूर : आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा चंग मराठा समाजाने बांधला आहे. त्यासाठी कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (14 डिसेंबर) या रॅलीला सुरुवात होईल. कोल्हापूर (Kolhapur) ते मुंबईपर्यंत (Mumbai) ही रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, ही रॅली मुंबईत नेमकी कुठे जाणार याबाबत अद्याप माहिती नाही. (rally from Kolhapur to Mumbai for Maratha reservation)
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रॅली
माराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. आरक्षणविषयक पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, माराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये सोमावरापासून ( 14 डिसेंबर) दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याची तयारीही राज्य सरकारने केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून अनेक गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. तशी माहिती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान हे आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (rally from Kolhapur to Mumbai for Maratha reservation)
पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha reservation) दिलेली अंतरीम स्थगिती उठवण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. तसा अर्जही राज्य सरकारने न्यायालयात दाखल केला होता. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीवर घटनापीठासमोर सुनावणी घेतली जावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. सरकारची ही मागणी मान्य करून पाच सदस्यीय घटनापीठासमोर मराठा आरक्षणविषयक सुनावणी सुरु आहे. पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काढण्यात येणाऱ्या ऱॅलीदरम्यान प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल असे, मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
“अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका, ही तर भाजपची केविलवाणी धडपड”
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार? की निर्णय ‘जैसै थे’? 9 डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी
तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; राऊतांची फडणवीसांवर टीका
(rally from Kolhapur to Mumbai for Maratha reservation)