‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला उशिर केलाय’, रामदास आठवलेंकडून मुख्यमंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी

राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय.

'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला उशिर केलाय', रामदास आठवलेंकडून मुख्यमंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 6:51 PM

मुंबई : “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फार उशिरा राजीनामा दिलाय. केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला पाहिजे,” असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले (Ramdas Athawale demand resignation of CM Uddhav Thackeray).

रामदास आठवले म्हणाले, “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे येणे. त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव आले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी रुपयांच्या हफ्ते वसुलीचा आरोप केला. हा आरोप महाराष्ट्राच्या गृहविभागालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारा होता. तेव्हाच गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे.”

“विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते हेच निष्पन्न”

“आज (5 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांची सीबीआय चौकशी लावली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा द्यायला फार उशीर केला आहे. उशिरा का होईना राजीनामा दिला हे स्वागतार्ह आहे. मात्र, विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते हेच यातून निष्पन्न होत आहे,” असंही रामदास आठवले यांनी म्हटलं.

“महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे”

रामदास आठवले म्हणाले, “महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. कोरोनाची स्थिती भयानक वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार कमी पडले आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाची अवस्था वाईट आहे. राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता आम्ही या आधीही महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ही मागणी केली होती. ही आमची मागणी योग्य आहे.”

“राज्यात बिघडलेली परिस्थिती पाहता आणि गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी सुरू झालीय. याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केले.

हेही वाचा :

राठोड गेले, देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर; भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे वक्तव्य

दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री होण्याची चिन्हं, उद्याच चार्ज घेणार?

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

व्हिडीओ पाहा :

Ramdas Athawale demand resignation of CM Uddhav Thackeray

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.