लोककलावंतांना प्रत्येकी 10 हजारांची मदत द्या, रामदास आठवले यांची ठाकरे सरकारकडे मागणी
आंबेडकरी गायक, भीम शाहीर, भारुड, तमाशा आदी लोककलावंतांना महाराष्ट्र राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबई : आंबेडकरी गायक, भीम शाहीर, भारुड, तमाशा आदी लोककलावंतांना महाराष्ट्र राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. “महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य आहे. आज महाराष्ट्राच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन आहे. तसेच जागतिक कामगार दिन कामगारांना प्रेरणा देणारा आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना 8 तासांचा दिवस आणि साप्ताहिक सुट्टी सारखे अनेक न्याय देणारे निर्णय घेतले,” असंही आठवले यांनी यावेळी नमूद केलं (Ramdas Athawale gives 5 thousand each to 40 local artist demand 10 thousand from state government).
आठवलेंकडून 40 गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची आर्थिक मदत
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना प्रत्येकी रुपये 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. आठवले यांचे 1 महिन्याचे वेतन 2 लाख रुपये आहे. त्यातून त्यांनी 40 गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी सीमा आठवले याही उपस्थित होत्या.
आंबेडकरी गायक; भीम शाहीर; तमाशा कलावंत; लोक कलावंत आदी कलावंतांना लॉक डाऊन च्या काळात राज्य सरकार ने प्रत्येकी 10 हजाराची मदत करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे.त्याबाबत चे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. pic.twitter.com/bvaDS38dqZ
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 1, 2021
लोककलावंतांना आर्थिक मदतीची राज्य सरकारकडे मागणी
रामदास आठवले म्हणाले, “कोरोनाचा कहर वाढत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना मागील वर्षांपासून कोणतेही कार्यक्रम मिळत नाही. अशी परिस्थिती असल्याने त्यांचा रोजगार बुडाला आहे. कलावंतांची आर्थिक स्थिती हालाकीची झाली आहे. त्यांना सर्वांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली पाहिजे. आंबेडकरी कलावंत आणि तमाशा लोककलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे.”
आज महाराष्ट्र् दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत आंबेडकरी गायक कलावंतांना माझ्या वेतनातून प्रत्येकी रुपये 5 हजाराची आर्थिक मदत केली.कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी कलावंतांची परिस्थिती हालाकीची झाली असुन त्यांना सर्वांनी आपल्यापरीने मदत करावी. pic.twitter.com/bRtQKliqeh
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 1, 2021
“माझ्या तर्फे आंबेडकरी कलावंतांना आज (1 मे) पहिल्या टप्प्यात 40 कलावंतांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत दिली आहे. लवकरच तमाशा कलावंतांना रिपाइं तर्फे मदत करण्यात येईल. तसेच राज्यातील विभाग निहाय कलावंतांनाही लवकरच आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असंही रामदास आठवले यांनी नमूद केलं.
बांद्रा पूर्व येथील संविधान निवासस्थानी आंबेडकरी गायक कलावंत अशोक निकाळजे; मैना कोकाटे; वैशाली शिंदे; छाया मोरे; चंद्रकला गायकवाड ;मुकुंद ओव्हाळ ; गौरी जाधव यांना रामदास आठवले आणि सीमाताई आठवले यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. अन्य कलावंतांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम पाठविण्यात येणार आहे. त्यात लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; प्रताप सिंह बोदडे; कडुबई खरात आदी 33 गायक कलावंतांचा समावेश आहे.
हेही वाचा :
रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करू नका; आठवलेंनी ठाकरे सरकारला डिवचले
‘केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?’
दलित भिकारी नाहीत, तर शिकारी आहेत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
व्हिडीओ पाहा :
Ramdas Athawale gives 5 thousand each to 40 local artist demand 10 thousand from state government