रामदास आठवले पूरग्रस्त खेड आणि चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले येत्या रविवारी (8 जुलै) रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त खेड आणि चिपळूणला भेट देणार आहेत.

रामदास आठवले पूरग्रस्त खेड आणि चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 10:28 PM

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले येत्या रविवारी (8 जुलै) रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त खेड आणि चिपळूणला भेट देणार आहेत. (Ramdas Athawale on an inspection tour of flooded Khed and Chiplun)

जुलैमध्ये अतिवृष्टीने खेड, चिपळूण आणि महाडमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात रामदास आठवले यांनी महाडला भेट देऊन पाहणी केली होती. तसेच दरडग्रस्त तळये गावाला भेट दिली होती. आता संसदेच्या अधिवेशनातून वेळ काढून ते येत्या रविवारी खेड आणि चिपळूणमधील पुरग्रस्तांची भेट घेणार आहेत.

आठवले खेडमधील पोसरे खुर्द बौद्ध वाडी या पूरग्रस्त गावाला रविवारी भेट देणार आहेत, अशी माहिती रिपाइंचे राज्य कमिटी सदस्य दादासाहेब मर्चंडे यांनी दिली आहे. खेडमधील पूरग्रस्त गावांना भेट दिल्यानंतर पूरग्रस्त चिपळूण शहरालादेखील भेट देणार आहेत.

डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा; आठवले यांची मागणी

दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरील गावांमध्ये भूस्खलन आणि दरड कोसळून मनुष्यहानी होत आहे. राज्यात दरड कोसळून अनेक निष्पाप लोकांचे मृत्यू झाले आहेत. तळीये गावात दरड कोसळून एकाचवेळी 40 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. घरांवर दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. नवीन गावे वसवावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली होती. गेल्या महिन्यात महाड येथील दरड कोसळलेल्या तळीये या गावातील दुर्घटनास्थळी रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आठवलेंनी ही मागणी केली होती.

तळीये हे गाव अत्यंत उंचावर आहे. तेथे पुन्हा घरे बांधणे धोक्याचे होईल त्यामुळे म्हाडाने त्यांना अन्य सुरक्षित स्थळी घरे बांधून देण्याची सूचना रामदास आठवले यांनी केली. महाड शहरात ही पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक घरांचे तसेच व्यापारी, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या दुकानदारांकडे विमा नाही त्यांनाही शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

इतर बातम्या

गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा : रामदास आठवले

‘कोरोना से मत हरोना, कोरोना को बरबाद करोना’; राज्यसभेत आठवलेंची आणखी एक कविता

(Ramdas Athawale on an inspection tour of flooded Khed and Chiplun)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.