एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही : वकील त्रिपाठी
रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच धनंजय मुंडे यांना एकीशी लग्न झाल्याने तिच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही, असं मत त्रिपाठी यांनी व्यक्त केलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर हनी ट्रॅपिंगचे आरोप झाले. यानंतर आज (15 जानेवारी) त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी दोन्ही सख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने तिच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही, असं मत त्रिपाठी यांनी व्यक्त केलं. याशिवाय रेणू शर्मा आज स्वतः माध्यमांसमोर आपल्यावरील आरोपांना उत्तर देणार होत्या. मात्र, काही कायदेशीर कामामुळे त्या आज येऊ शकल्या नाहीत. त्या उद्या माध्यमांसमोर येऊ उत्तर देतील, असंही त्यांनी नमूद केलं (Ramesh Tripathi Advocate of Renu Sharma answer on allegations of Honey Trap).
रमेश त्रिपाठी म्हणाले, “रेणूवरील आरोप केवळ मीडियातून आले आहेत. त्याबाबत कुणीही आम्हाला नोटीस दिलेली नाही. जेव्हा पोलिसांकडून नोटीस येईल तेव्हा त्यावर बोलू. मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देऊ, मात्र, हे पुरावे मीडियाला देणार नाही. करूणा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. दोन्ही सख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही.”
“रेणू शर्मांवर बलात्कार करण्यात आला. त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून शर्मा यांनी केस दाखल केली नव्हती. मात्र शनिवारी ( 16 जानेवारी) आमचा एफआयआर दाखल होणार आहे. जर पोलिसांनी एफआरआय दाखल करुन घेतला नाही, तर कोर्टात जाऊ,” असंही रमेश त्रिपाठी यांनी सांगितलं.
‘रेणू शर्मांची केस सोडा, अन्यथा जीवे मारू’
रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी आपल्याला सातत्याने धमक्या येत असल्याचं सांगितलंय. रेणू शर्मा यांंची केस सोडा, अन्यथा जीवे मारु, असे धमकीचे फोन त्रिपाठी यांना येत आहेत. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती देत पोलीस संरक्षणाचीही मागणी केलीय.
त्रिपाठी म्हणाले, “मला धमक्या देण्यात येत आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजल्यापासून धमक्या दिल्या जात आहेत. तुम्ही केस सोडा, त्यांच्याविरोधात केस लढू नका, असं धमकावलं जात आहे. मला फोनवरुन शिव्या घातल्या जात आहेत. वकिलाला घाबरवण्यापेक्षा कोर्टात जावं.”
संबंधित बातम्या :
Dhananjay Munde Case : धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप; विनायक मेटे म्हणतात…
मुंबई पोलिसांवर विश्वास, ते मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील : शरद पवार
व्हिडीओ पाहा :
Ramesh Tripathi Advocate of Renu Sharma answer on allegations of Honey Trap