संपादक रश्मी ठाकरेंच्या दै. सामनात श्रीधर पाटणकरणांची बातमी कुठे होती? ‘सामना’तील बातमीची Inside स्टोरी

Rashmi Thackeray Brother : ईडी कारवाईवरुन संजय राऊत आणि शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील दैनिक सामनामध्ये छापण्यात आल्या आहेत. 'पुष्पक ग्रूपची सहा कोटींची मालमत्ता जप्त' अशा हेडलाईनखाली हे वृत्त देण्यात आलं आहे.

संपादक रश्मी ठाकरेंच्या दै. सामनात श्रीधर पाटणकरणांची बातमी कुठे होती? 'सामना'तील बातमीची Inside स्टोरी
दै. सामनावर सगळ्यांची नजरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 2:51 PM

मुंबई : मंगळवारची संध्याकाळ ईडीच्या कारवाईनं पुन्हा एकदा गाजली. रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकरांवर (Rashmi Thackeray Brother Shridhar Patankar) ईडीनं कारवाई केली. या कारवाईवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं असतानातच सगळ्यांच लक्ष हे दैनिक सामनाच्या बुधवारच्या अंकाकडे लागलं होतं. एकीकडे उद्धव ठाकरेंचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू इतर सर्व दैनिकांत फ्रंट पेजवर असले, तर दैनिक सामनामध्ये (Saamana) ही बातमी नेमकी कुठे छापून येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दैनिक सामनाच्या संपादक या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आहेत. त्यामुळे आपल्या भावावर झालेल्या कारवाईची बातमी नेमकी दैनिक सामनात कुठे छापून येते, याचीही चर्चा होणं स्वाभाविक आहे. दैनिक सामनामध्ये श्रीधर पाटणकरांच्या ईडी कारवाईवरील (ED) वृत्त पान क्रमांक दोनवर वरील बाजूस देण्यात आलं होतं. अवघ्या 100 शब्दांच्या आत आणि दोन कॉलममध्ये हे वृत्त देण्यात आलं होतं. दरम्यान, अद्यापतरी रश्मी ठाकरे यांनीही या संपूर्ण कारवाईवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्या नेमकं या कारवाईबाबत काय म्हणतात, हे पाहणंही महत्त्वाचंय.

संजय राऊत आणि पवारांच्या प्रतिक्रिया

ईडी कारवाईवरुन संजय राऊत आणि शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील दैनिकासामनामध्ये छापण्यात आल्या आहेत. ‘पुष्पक ग्रूपची सहा कोटींची मालमत्ता जप्त’ अशा हेडलाईनखाली हे वृत्त देण्यात आलं आहे. ईडीची खुसघोरी सुरुच, असा टोलाही या वृत्तातून लगावण्यात आला आहे.

दरम्यान, 23 मार्चच्या दैनिक सामनामधील संपादकीय हे ईडीवर नसून ते पाकव्याप्त काश्मीरबाबत आणि मोदींच्या धोरणावर होतं. मोदींचा संकल्प बरा आहे, पण हिंमत आहे का? असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. श्रीधर पाटणकरांची बातमी दै. सामनात दुसऱ्या पानावर
  2. पाटणकरांची बातमी 100 पेक्षाही कमी शब्दांत
  3. अवघ्या दोन कॉलमची बातमी
  4. पाटणकरांच्या वृत्तामध्ये संजय राऊत आणि शरद पवारांच्या प्रतिक्रिया

नेमकं हे सगळं प्रकरण काय ते समजून घ्या? या 10 फोटोंमधून

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?

मंगळवारी विधीमंडळाचं काम आटपल्यानंतर माध्यमांनी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती घेऊन नंतर बोलेन, असं म्हटलं होतं. या कारवाईबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं होतं. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत, असं म्हटलंय. दरम्यान, दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक ही सगळी कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जातो आहे.

संबंधित बातम्या :

Somaiya on Thackeray | ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम की…सोमय्यांचा तिखट सवाल

मनसेचा दोन वर्षानंतर मुंबईत पाडवा मेळावा; Raj Thackeray पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?

‘आगे आगे देखो होता है क्या’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा; चोराच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचाही आरोप

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.