मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर, रुग्णांचे होणार हाल

मुंबईतील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या जे.जे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी अचानक सामुहिक रजा आंदोलन सुरु केल्याने रुग्ण सेवेला फटका बसला आहे. निवासी डॉक्टरांच्या या सामुहिक रजा आंदोलनाला मार्ड संघडनेने पाठींबा दिला आहे. त्यामुळे केईएम, नायर, सायन रुग्णालयातील सेवेवर परिमाण झाला आहे.

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर, रुग्णांचे होणार हाल
jj hospitalImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 1:01 PM

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : मुंबईतील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संप आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे ओपीडी पेशंटवर उपचार मिळण्यास अडचणी येणार असून रुग्णांना अडचणींना सोमोरे जावे लागू शकते. मुंबईतील निवासी डॉक्टरांनी संघटना मार्डने या संपाला पाठींबा दिल्याने मुंबईतील रुग्ण सेवाबाधित होण्याची शक्यता वर्तवविण्यात येत आहे.

मुंबईतील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप आंदोलन सुरु केले आहे. त्याला केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पाठींबा दिला आहे. सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस असताना रुग्णालयात गर्दी असताना जे.जे.च्या निवासी डॉक्टरांनी अचानक काम बंद आंदोलन सुरु केल्याने त्याचा फटका हजारो रुग्णांना बसणार आहे. त्यामुळे ओपीडीतील रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येणार आहेत. या मुंबईतील जे.जे.रुग्णालयात सर्वाधिक ओपीडीची ( बाह्य रुग्ण विभाग ) संख्या असते. जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांनी सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते.

काय आह नेमके आंदोलन

जे.जे.रुग्णालयातील त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण कुरा यांच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. रुग्णांचे मृत्यू , निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी, सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि विभागप्रमुखांकडून सातत्याने होणारा त्रास अशा विविध कारणांमुळे जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जे . जे . रुग्णालय प्रशासनासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विभागप्रमुखांवरील कार्यवाहीबाबत सातत्याने होणारे दुर्लक्ष पाहता मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या संपाला पाठींबा दिला आहे. या सामुहिक रजा आंदोलनाचा फटका रुग्णसेवेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.