राष्ट्रवादीचा 18 जिल्ह्यांवर डोळा, ‘या’ जिल्ह्यात डाव टाकणार?; मुंडे, खडसे, आव्हाड यांच्याकडे कोणती जबाबदारी?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. राष्ट्रवादीने आपल्या नेत्यांकडे 18 जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादीचा 18 जिल्ह्यांवर डोळा, 'या' जिल्ह्यात डाव टाकणार?; मुंडे, खडसे, आव्हाड यांच्याकडे कोणती जबाबदारी?
ncp leaderImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 9:12 PM

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय. या निवडणुकीत भाजपचा अनपेक्षित आणि धक्कादायक पराभव झाला आहे. काँग्रेस स्वबळावर लढून सुद्धा भाजपचा कर्नाटकात पराभव करू शकते तर सर्व विरोधक एकत्र आल्यास भाजपला पळता भूई थोडी होईल हा विश्वास विरोधकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधकही एकवटले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या चर्चा करण्यात आल्या. तसेच प्रत्येक राज्यातील 18 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या 17 जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन ते तीन नेत्यांवर देण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस या 18 जिल्ह्यांमध्ये मोर्चे बांधणी करणार आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, नरहरी झिरवळ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. यावेळी बुथ कमिट्यांचा कार्यक्रम अधिक भक्कम व सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर नेत्यांच्या कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कमिट्या जाहीरही करून नेत्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी विभाग स्तरावर शिबिरे आयोजित करून त्या शिबिराला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

19 नेत्यांवर 18 जिल्ह्यांची जबाबदारी

यावेळी 18 जिल्ह्यातील बुथ कमिटी बांधणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार बुथ प्रमुख आणि सह बुथ प्रमुखांची निवड करण्यात आली असून 19 नेत्यांवर या 18 जिल्ह्यांमध्ये बुथ बांधणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘एक तास राष्ट्रवादी’साठी

राष्ट्रवादीकडून महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमावर अधिक भर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

कुणाकडे कोणता जिल्हा

नागपूर – अनिल देशमुख (बुथ प्रमुख, मनोहर चंद्रिकापुरे (सह बुथप्रमुख)

अमरावती – राजेंद्र शिंगणे (बुथ प्रमुख), अमोल मिटकरी (सह बुथ प्रमुख)

ठाणे, पालघर – जितेंद्र आव्हाड (बुथ प्रमुख), सुनील भुसारा (सह बुथ प्रमुख)

मराठवाडा विभाग, नाशिक, नगर – धनंजय मुंडे (बुथ प्रमुख), विक्रम काळे, सतिश चव्हाण (सह बुथ प्रमुख)

कोल्हापूर, सातारा, सांगली – शशिकांत शिंदे (बुथ प्रमुख), अरुण लाड (सह बुथ प्रमुख)

पुणे – सुनील शेळके (बुथ प्रमुख), चेतन तुपे (सह बुथ प्रमुख)

सोलापूर – अशोक पवार (बुथ प्रमुख), चेतन तुपे (सह बुथ प्रमुख)

जळगाव, धुळे, नंदुरबार – अनिल भाईदास पाटील (बुथ प्रमुख), एकनाथ खडसे (सह बुथ प्रमुख, आवश्यकता भासल्यास)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (बुथ प्रमुख), शेखर निकम (सह बुथ प्रमुख)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.