मुंबईतील निर्बंध आणखी शिथील, रात्रीची संचारबंदी हटवली, नवे नियम काय?
मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या अटोक्यात आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहे. मुंबईत काल केवळ एक हजार रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील रात्रीची संचारबंदी (Night Curfew) हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईत आजपासून सुधारीत नवी नियमावली (New Rules In Mumbai) जाहीर झाली आहे. तर मुंबईतली सर्व पर्यटन स्थळही खुली होणार असल्यची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी गूड न्यूज आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीलचा ओमिक्रॉनने मुंबईची चिंता चांगलीच वाढवली होती. कारण एकट्या मुंबईतील रुग्णसंख्या ही पंचवीस हजारांच्या जवळ जाऊन पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या सतत नियंत्रणात येत आहे. सोमवारी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली गेल्याने प्रशासनाने आवळलेले निर्बंध आता पुन्हा शिथिल करण्यास सुरूवात केली आहे.
असे असतील नवे नियम
- मुंबईत रात्रीची संचारबंदी उठवली
- मुंबईतली सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार
- स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
- अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल
- चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार
- स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू
- रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू
- धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी
- लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
- खेळाच्या मैदानात 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
देशासह जग गेल्या जवळपास अडीच वर्षापासून कधी कडक लॉकडाऊनमध्ये तर कधी निर्बंधात दिवस काढत आहे. कोरोनाने जगाला हैराण करून सोडले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची दाहकता अजूनही दिसून दिसून येते. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतलं मृत्युतांडव आणि रुग्णांचे हाल आपण सर्वांनी पाहिले आहेत. दुसरी लाट संपल्यानंतर थोडासा दिलास मिळाला होता. उद्योगधंदे पुन्हा सुरू होत होते. मात्र तेवढ्यात कोरोनाची तिसरी लाट आली, आणि पुन्हा जगाला धडकी भरवली. पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार उभी राहिली. त्यामुळे अनेकांच्या मनात उद्योगधंदे पुन्हा बुडण्याची भिती होती, त्यातच तिसऱ्या लाटेबरोबर ऑमिक्रॉन व्हेरिएंटच्या येण्याने हा दुष्काळात तेरावा वाटू लागला. मात्र प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे आणि लोकांच्या सतर्कतेमुळे रुग्ण पुन्हा अटोक्यात येत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच लसीकरणही यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध शिथील होत आहेत.