Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा वाढला, नेमक्या कोणत्या वयाला जास्त धोका? कारण काय?

राज्याची राजधानी मुंबईत लहान मुलांभोवतीचा कोरोनाचा विळखा वाढल्याचं समोर आलंय.

मुंबईत लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा वाढला, नेमक्या कोणत्या वयाला जास्त धोका? कारण काय?
Corona in Child Children
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 12:09 AM

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईत लहान मुलांभोवतीचा कोरोनाचा विळखा वाढल्याचं समोर आलंय. लहान वयोगटातील मुलांमध्ये 55 टक्के, तर मुलींमध्ये 45 टक्के कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होऊ लागला आहे. आतापर्यंत प्रौढ व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलंय. परंतु आता मोठ्यांप्रमाणे लहानग्यांना देखील कोरोनाचा विळखा बसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह मुलांच्या पालकांचीही काळजी वाढलीय (Risk of Corona infection in children increases in Mumbai).

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 0 ते 9 वयोगटात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6,892 अशी नोंदवली गेली आहे. त्यात मुलांमध्ये 55 आणि मुलींमध्ये 45 टक्के इतक्या प्रमाणात कोरोना आढळला आहे. तर 10 ते 19 वयोगटातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17,549 अशी आहे.

मुलांमध्ये 55 टक्के आणि मुलींमध्ये 45 टक्के कोरोना संसर्ग

या आकडेवारीत मुलांचे प्रमाण 55 टक्के आणि मुलींचे प्रमाण 45 टक्के एवढे आहे. या दोन्ही वयोगटातील एकूण मृत्यूचा आकडा अनुक्रमे 17 आणि 32 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

50 ते 59 वर्षे वयोगटात 78,471 कोरोना रुग्ण

पालिकेने संपूर्ण वर्षभराच्या अनुषंगाने कोरोनाबाधित रुग्णांची 0 ते 9, 10 ते 19, 20 ते 29, 30 ते 39, 40 ते 49, 50 ते 59, 60 ते 69, 70 ते 79, 80 ते 89 आणि त्यावरील वयोगटाप्रमाणे नोंद केली आहे. त्यापैकी 50 ते 59 वर्षे वयोगटात 78,471 एवढे रुग्ण आहेत. त्यापैकी पुरुषांचे प्रमाण 43,107 असून महिलांचे प्रमाण 35,311 एवढे आहे.

1 एप्रिलपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,11,424 इतकी

मुंबई महानगरपालिकेच्या 1 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,11,424 इतकी आहे. तसेच एकूण मृतांची संख्या 11,755 इतकी आहे. या नोंदीच्या आधारे पालिकेने वर्गवारी केली आहे. कोरोना संदर्भात मुलांमधील संक्रमणाचा विचार करताना 0 ते 9 वर्षे वयोगटातील 6,892 मुलांचा समावेश आहे. त्यापैकी मुलांची संख्या 3,791 आणि मुलींची संख्या 3,101 एवढी आहे. 10 ते 19 वर्षे वयोगटातील 17,549 रुग्णांमध्ये 9,140 मुले आणि 7,699 मुलींचा समावेश आहे. या दोन्ही वयोगटातील मृत्यू संख्या अनुक्रमे 17 आणि 32 अशी आहे.

हेही वाचा :

मुंबई पुन्हा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता, महिनाभरात तब्बल 45 हजार सक्रीय रुग्ण

बीएमसी प्रशासन दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जावू नये : महानगरपालिका आयुक्‍त चहल

अरे देवा! भारतात कोरोना पुन्हा पीक पॉईंटला; एका दिवसातील सर्वाधिक वाढ, 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात

व्हिडीओ पाहा :

Risk of Corona infection in children increases in Mumbai

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.