VIDEO | भयानक थरार, RPF जवान देवासारखा धावून आला, पण तरुणासोबत जे घडलं ते….

| Updated on: Mar 20, 2023 | 8:50 PM

मुंबईतील वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर एका आरपीएफ जवानाने प्रवाशाचे प्राण वाचवले आहे. हा प्रवासी धावती ट्रेन पकडत असताना त्याचा रेल्वे रुळाच्या दिशेला तोल गेला. याचवेळी आरपीएफ जवानाने प्रसंगावधान जाणून प्रवाशाचे प्राण वाचवले. हा थरारक क्षण सीसीटीव्हीत कैद झालाय.

VIDEO | भयानक थरार, RPF जवान देवासारखा धावून आला, पण तरुणासोबत जे घडलं ते....
Follow us on

मुंबई : रेल्वे स्थानकावर गाडी पकडताना कधीही घाई करु नका. रेल्वे स्थानकावर योग्य वेळत या. धावती ट्रेन पकडू नका , असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून नेहमी केलं जातं. पण तरीही वारंवार अनपेक्षित अशा घटना घडतातच. मुंबईतील वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) रेल्वे स्थानकावर असाच काहीसा प्रकार आज समोर आलाय. एक प्रवासी धावती ट्रेन पकडत होता. यावेळी एक अनपेक्षित प्रकार बघायला मिळाला. हा तरुण रेल्वे गाडी आणि फलाटादरम्यान असणाऱ्या अंतरातून थेट रेल्वे रुळाच्या दिशेला चालला होता. पण सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानाने धावत जाऊन या प्रवाशाचा जीव वाचवला. संबंधित प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे आज सकाळी 11 वाजता दिनेश नावाचा प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना त्याला ट्रेनची धडक बसली. घटनास्थळी उपस्थित आरपीएफ जवान सुशील कुमार यांनी प्रसंगावधान जाणून आपला जीव धोक्यात टाकला आणि प्रवाशाचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. अतिशय थरारक अशी ही घटना आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

संबंधित प्रवासी दिनेश हा स्वराज एक्स्प्रेस पकडण्याच्या प्रयत्नात होता. तो फलाटावर पोहोचला तोपर्यंत उशिर झालेला होता. कारण फलटावरुन गाडी सुटली होती. गाडी सुरु झालेली आणि हळूहळू वेग पकडू लागलेली. यावेळी दिनेश फलाटावर पोहोचला. त्याने धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यात यश मिळालं नाही. तो गाडी पकडत असताना थेट खाली पडला आणि रेल्वे रुळाच्या दिशेला जाऊ लागला.

संबंधित प्रकार घडत असताना आरपीएफ जवान सुशील कुमार हे फलाटावर उपस्थित होते. पण ते दिनेश पासून बरेच लांब होते. दिनेश खाली पडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तातडीने धाव घेत प्रवाशाला बाहेर ओढलं आणि प्रवासी फलाटावर कोसळला. यावेळी खूप धावाधाव झाली. पण प्रवाशाचा जीव बचावल्याने समाधान व्यक्त करण्यात आलं.

प्रवाशाला जखमी तर झालेला नाही ना? याबाबत चौकशी करण्यात आली. त्याला पिण्यासाठी पाणी देण्यात आलं. त्याला धावती ट्रेन पकडताना सावधगिरी बाळगावी, असं समजवण्यात आलं. यावेळी प्रवाशाने आरपीएफ जवानाचे आभार व्यक्त केले. दरम्यान, संबंधित प्रवाशाला या घटनेत किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.