आधी मणिपूर ‘सेफ’ करा!; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल

Saamana Editorial on PM Narendra Modi : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला आहे. आधी मणिपूर 'सेफ' करा!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. वाचा सविस्तर.....

आधी मणिपूर 'सेफ' करा!; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल
नरेंद्र मोदी, संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 7:48 AM

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. मणिपूर आणि आसामच्या सीमेवर असणाऱ्या जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडला. त्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. इंफाळच्या खोऱ्यात आमदार आणि मंत्र्यांच्या घरांवर हल्ला करण्यात आला. मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘एक हा तो सेफ है’ नारा दिला होता. त्यावरूनच संजय राऊत यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय. आधी मणिपूर ‘सेफ’ करा!, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’ अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत. मोदीसाहेब, महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे, तर हा संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील. तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो ‘अनसेफ’ करीत आहात. मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्यदेखील आज वांशिक भेद आणि त्यातून उफाळणाऱया हिंसाचाराने असुरक्षित बनले आहे ते तुमच्याच राजवटीमुळे. आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा!

मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात’आफस्पा’ कायदा लागू करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. सध्या ज्या जिरीबाम जिह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे तेथेही हा कायदा लागू असेल. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला, असे मोठय़ा तोंडाने सांगणाऱया केंद्रीय सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली? मणिपूरमधील हिंसाचाराने आतापर्यंत 250 पेक्षा जास्त निरपराध्यांचे बळी घेतले आहेत. 7 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या फक्त दहा दिवसांत तेथे 17 जण मृत्युमुखी पडले आहेत. मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे.

सध्या ज्या जिरीबाम जिह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे तेथेही हा कायदा लागू असेल. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला, असे मोठय़ा तोंडाने सांगणाऱया केंद्रीय सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली? मणिपूरमधील हिंसाचाराने आतापर्यंत 250 पेक्षा जास्त निरपराध्यांचे बळी घेतले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.