रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा दोष काय?; सचिन सावंतांचा फडणवीसांना सवाल

ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (sachin sawant slams Devendra Fadnavis over bruck pharma owner interrogation)

रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा दोष काय?; सचिन सावंतांचा फडणवीसांना सवाल
सचिन सावंत, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 10:11 AM

मुंबई: रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले तर त्यात पोलिसांचा दोष काय? कोरोना महामारीच्या काळात अशाप्रकारची साठेबाजी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असेल तर चुकले कुठे?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना विचारला आहे. (sachin sawant slams Devendra Fadnavis over bruck pharma owner interrogation)

ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची माहिती मिळताच काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे इतर नेते पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यावर सचिन सावंत यांनी लागोपाठ तीन ट्विट करत ही टीका केली आहे. एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? त्यांच्याकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या 60 हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीसुध्दा धावले?, असा सवाल सावंत यांनी केला आहे.

पोलीस चौकशीला बोलावू शकत नाहीत का?

कोरोना महामारीमध्ये रेमडेसिवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत? भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का? आपलं कर्तव्य तत्परतेने बजावणाऱ्या डीसीपी मंजुनाथ सिंगे आणि टीमचे जाहीर अभिनंदन व भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध करत आहोत, असंही म्हटलं आहे.

म्हणून चौकशीला बोलावलं

या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

नेमका प्रकार काय?

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. (sachin sawant slams Devendra Fadnavis over bruck pharma owner interrogation)

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

(sachin sawant slams Devendra Fadnavis over bruck pharma owner interrogation)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.