AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Vaze Case : NIA प्रकरणात जप्त केलेली मर्सिडीज 4 मॅटिक कार मूळ धुळ्यातली!

NIA ने जप्त केलेली ही मर्सिडीज कार मूळची धुळ्यातील असल्याची माहिती मिळतेय. तशी माहिती मर्सिडीज कारचे जुने मालक आणि धुळे RTO ने दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात धुळे कनेक्शन समोर येत आहे.

Sachin Vaze Case : NIA प्रकरणात जप्त केलेली मर्सिडीज 4 मॅटिक कार मूळ धुळ्यातली!
या मर्सिडीज कारमध्ये जवळपास 5,75,000 लाखांची रोकड सापडली आहे. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत.
| Updated on: Mar 16, 2021 | 10:15 PM
Share

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAने जप्त केलेली मर्सिडीजबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. NIA ने जप्त केलेली ही मर्सिडीज कार मूळची धुळ्यातील असल्याची माहिती मिळतेय. तशी माहिती मर्सिडीज कारचे जुने मालक आणि धुळे RTO ने दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात धुळे कनेक्शन समोर येत आहे.(The Mercedes car seized by the NIA is said to be from Dhule)

मनसुख हिरेन यांनी ज्या मर्सिडीज गाडीमध्ये शेवटचा प्रवास केला आणि सचिन वाझे जी कार वापरत होते असं सांगितलं जात आहे, ती मर्सिडीज कार ही मूळ धुळ्यातील असल्याचं आता समोर आलं आहे. ही गाडी सारांश भावसार यांची होती. त्यांनी ही कार काही दिवसांपूर्वीच विकली असल्याचा दावा केला आहे. याबाबत सारांश भावसार हे उद्या पत्रकार परिषद घेऊन खुलासाही करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सारांश भावसार काय म्हणाले?

“ही गाडी माझी होती. फेब्रुवारी महिन्यात ही गाडी मी विकली आहे. त्याबाबतचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि तपास अधिकाऱ्यांकडून विचारणा झाल्यास त्यांना सहकार्य करेन. मी cars24 ला ही गाडी विकली आहे. ज्याच्याशी माझा व्यवहार झाला त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही”, असं सारांश भावसार यांनी म्हटलंय.

संपूर्ण प्रकरणात मर्सिडिज कारची भूमिका महत्वाची

सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए एका मर्सिडिज कारच्या शोधात होती. त्यानंतर संबंधित मर्सिडीज आज एनआयएकडून जप्त करण्यात आली. या कारच्या डिक्कीची पाहणी सुरु आहे. या डिक्कीत काही कपडे आणि अन्य काही वस्तू सापडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे या तपासणीदरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात या मर्सिडिज कारची भूमिका स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ इतकीच महत्वाची असल्याचं बोललं जात आहे.

NIA च्या हाती महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज

NIAच्या हाती एका मर्सिडिज कारचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं होतं. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचं असल्याचं सांगण्यात येत आहे. याच मर्सिडिजमध्येच मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला होता. NIAला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन कुणाची तरी वाट पाहत होते असं दिसतंय. काही वेळाने त्यांच्याजवळ ही मर्सिडिज कार येते. हिरेन त्या गाडीत बसून निघून जात असल्याचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. NIAच्या हाती लागलेलं हे सीसीटीव्ही फुटेज मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या काळातलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

‘ती’ मर्सिडिज मिळाल्यास प्रकरणातील गूढ समोर येणार

महत्वाची बाब म्हणजे ही मर्सिडीज कार स्वत: सचिन वाझेच वापरत असल्याची माहिती समोर येत आहे. या कारला अनेकदा बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या मर्सिडीज कारच्या डिक्कीतून एनआयएच्या हाती नेमके कोणते पुरावे लागतात हे महत्वाचं ठरणार आहे. मनसुख हिरेन यांनी या गाडीतून शेवटचा प्रवास केला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या डिक्कीत काय दडलं होतं? ती गाडी कुणी हाताळली होती? याचा शोध फॉरेन्सिक टीम घेण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Sachin Vaze case : ‘त्या’ मर्सिडीजच्या डिक्कीत कोणतं गूढ दडलंय? NIA अधिकाऱ्यांकडून शोध सुरु

VIDEO: त्या PPE किटमध्ये सचिन वाझे? NIA चा संपूर्ण तपास ह्या 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती फिरतोय, कसा लागणार छडा? वाचा सविस्तर

The Mercedes car seized by the NIA is said to be from Dhule

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.