सह्याद्री गेस्ट हाऊस आणि राजभवनाजवळ वाझेकडून देशमुखांच्या सचिवाला पैशाने भरलेल्या 16 बॅगा; आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अधिकच गोत्यात येण्याची शक्यता दिसत आहे. ईडीने या प्रकरणी दोन आरोपपत्रं विशेष न्यायालयात दाखल केली असून त्यात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. (Sachin Waze among 14 accused named in ED chargesheet on ‘bribe money-laundering’)

सह्याद्री गेस्ट हाऊस आणि राजभवनाजवळ वाझेकडून देशमुखांच्या सचिवाला पैशाने भरलेल्या 16 बॅगा; आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा
anil deshmukh
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 6:27 PM

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अधिकच गोत्यात येण्याची शक्यता दिसत आहे. ईडीने या प्रकरणी दोन आरोपपत्रं विशेष न्यायालयात दाखल केली असून त्यात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने देशमुख यांच्या सचिवाला 16 बॅगा भरून पैसे दिले. एकदा नव्हे तर दोनदा ही रक्कम देण्यात आल्याची धक्कादायक माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sachin Waze among 14 accused named in ED chargesheet on ‘bribe money-laundering’)

ईडीने विशेष न्यायालयात दोन आरोपपत्रं दाखल केली आहेत. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांचे खासगी आणि सरकारी पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात ही दोन्ही आरोपपत्रं दाखल करण्यात आली आहेत. अनिल देसमुख गृहमंत्री असताना सचिन वाझेने कुंदन शिंदेकडे दोन वेळा पैशांनी भरलेल्या 16 बॅगा दिल्याचं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. पहिल्यावेळी सह्याद्री गेस्ट हाऊस बाहेर आणि दुसऱ्यांदा राजभवनाबाहेर 4 कोटी 60 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

बार मालकांकडून वसुली

जानेवारी ते फेब्रुवारी 2021 दरम्यान वाझेने देशमुख यांच्या सांगण्यावरून ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास 64 कोटी रुपये वसूल केले होते. मुंबई पोलिसांच्या झोन 1 आणि झोन 7 मधून हा पैसा गोळा करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पैसा कुठे गुंतवला?

हा पैसा कुठे गुंतवला याची माहितीही आरोपपत्रात देण्यात आली आहे. वाझेकडून मिळालेला हा पैसा रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, व्ही ए रियल कोन प्रायव्हेट लिमिटेड, उत्सव सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि शिताल लिजिंग अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आल्याचं सांगितलं जातं. नंतर हा पैसा विविध बँकांमधून श्री साई शिक्षण संस्थे ट्रस्टमध्ये वर्ग करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

शिक्षण संस्थेत बेनामी व्यवहार

ईडीने श्री साई शिक्षण संस्थेच्या कारभाराचीही चौकशी केली. यावेळी ईडीला धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2013पासूनचे हे बेनामी व्यवहार ईडीच्या हाती लागले आहेत. देशमुख यांच्याच कुटुंबातील एक सदस्य हा काळा पैसा पांढरा करत असल्याचंही उघड झालं होतं.

आयकर विभागाच्या धाडी

दरम्यान, देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली. अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे. (Sachin Waze among 14 accused named in ED chargesheet on ‘bribe money-laundering’)

संबंधित बातम्या:

आधी ईडी, मग सीबीआय, आता इन्कम टॅक्सकडूनही अनिल देशमुखांवर धाडी!

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांचा ईडी तपास सुरु, ECIR दाखल

ईडीचा पुन्हा दणका; अनिल देशमुखांशी संबंधित तीन ठिकाणांवर धाडी!

(Sachin Waze among 14 accused named in ED chargesheet on ‘bribe money-laundering’)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.