हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

मनसुख हिरेन यांची गाडी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंकडे कशी आली? असा सवाल करतानाच वाझे हे हिरेन यांची गाडी वापरत होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (sachin waze clarification on devendra fadnavis allegations)

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले
sachin waze
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 7:12 PM

मुंबई: मनसुख हिरेन यांची गाडी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंकडे कशी आली? असा सवाल करतानाच वाझे हे हिरेन यांची गाडी वापरत होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांचा हा आरोप सचिन वाझे यांनी फेटाळून लावला आहे. गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा होत नाही, असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. (sachin waze clarification on devendra fadnavis allegations)

गेल्या तीन दिवसांपासून मनसुख हिरेन प्रकरणावरून सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका केली जात आहे. फडणवीस यांनी हिरेन प्रकरण विधानसभेत लावून धरल्याने वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आजही या प्रकरणावरून फडणवीस यांनी वाझे यांच्यावर आरोप केले होते. त्यावर वाझे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रसारमाध्यमांनी सचिन वाझे यांना फडणवीसांच्या आरोपांबाबत विचारलं असता, गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही, असं वाझे म्हणाले. गाडी माझ्याकडे असणं आणि नसणं यात गुन्हा काय? गाडी माझ्याकडं असणं हा आरोप आहे का? यात आरोप काय? आरोप काय आहेत त्यात ते तर सांगा, असं वाझे म्हणाले. यावेळी त्यांना विमला हिरेन यांनी जबाबात तुमचं नाव घेतलं आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर मी जबाब वाचला नाही. त्यांनी काही आरोप केला जबाब वाचतो आणि त्यानंतर उत्तर देतो, असं ते म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले होते?

हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी जबाब दिला आहे. त्यात अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ही हिरेन यांची असून ही कार नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत वाझे वापरत होते, असं म्हटलं आहे. वाझे हे हिरेन यांना ओळखत नाहीत तर त्यांच्याकडे ही कार कशी आली? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांचे आणखी आरोप

हा जो मनसुख हिरेन आहे. यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय विठ्ठल गावडे यांच्याठिकाणी आहे. 40 किमीवर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत? 201 खाली सचिन वाझेंना अटक का झाली नाही? ३०२ चं सोडून द्या. मला राजकारण नको. ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी देणंघेणं नाही. कोण वाचवतंय, आणि कशासाठी वाचवतंय. आम्हाला संशय आहे, मनसुख हिरेन यांची हत्या गाडीमध्ये करण्यात आली. गावडेंच्या एरियात करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांची बॉडी खाडीत फेकण्यात आली. यांची चूक कुठे झाली, यांना वाटलं हाय टाईड आहे. बॉडी परत आली नसते, लो टाईड होती, म्हणून परत आली. 302 च होत राहिल. तात्काळ सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस त्यांनी विधानसभेत केली होती. (sachin waze clarification on devendra fadnavis allegations)

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

(sachin waze clarification on devendra fadnavis allegations)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.