Sadabhau Khot : टायर डिझेल ते बांधकाम सगळ्याच गोष्टीत भ्रष्टाचारानं यांचे हात बरबटलेले, सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST Workers Strike) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST Workers Strike) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जवळजवळ दहा हजार कर्मचारी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. आता काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणार आहेत, असं ते सांगत आहेत. या महाविकास आघाडी (MVA) सरकारचे मंत्री एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही तुम्हाला काढून टाकू, अशा प्रकारची धमकी देत आहेत.मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, हे काय तुमच्या बापाचा शेत नाही. ही लाल परी हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
आघाडी सरकारवर विश्वास राहिला नाही
अनेक कामगार आत्महत्या करत आहेत. वेतनवाढ झाल्यानंतर सुद्धा विलीनीकरणावर ठाम आहेत. तरी देखील त्यांचं समाधान होत नाही याचा विचार प्रथम करण्यात यावा, असं सदाभाऊ खोत म्हणाले. आता कर्मचाऱ्यांचा या आघाडी सरकार विश्वासच राहिला नाही,अशी टीका खोत यांनी केली.
टायर ते बांधकाम सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार
टायर, डिझेल, एसटी, बांधकाम, शौचालय, मुतारी या सगळ्याच गोष्टीत त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. कोणतीच गोष्ट शिल्लक ठेवली नाही यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, असल्याचा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
इथं कोणी पर्मनंट नाही, जनता खरी मालक
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून कारवाई करण्याचे आदेश जात आहेत. पण इथे कोणीही मंत्री, आमदार पर्मनंट होत नाही. आपण इथं साल गडी म्हणून आहोत. इथं आपल्याला लोकांनी सेवा करायला ठेवलयं. जनता खरी मालक आहे हे लक्षात ठेवून निर्णय घेणे अपेक्षित आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले. या महाविकास आघाडीचा भोंगळ कारभार काय संपता संपत नाही, अशी टीका देखील खोत यांनी केलीय.
इतर बातम्या:
Sadabhau Khot slam MVA Government over ST Workers strike over demand of Merger