भिंत अंगावर पडून पाय गमावलेली साक्षी आता पुन्हा धावणार; धावपटू होण्याचं स्वप्न होणार साकार

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात गतवर्षी झालेल्या प्रलयंकारी पावसात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवेळी आपला जीव धोक्यात घालून साक्षी दाभेकर या 14 वर्षांच्या मुलीने एका दोन महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवले होते.

भिंत अंगावर पडून पाय गमावलेली साक्षी आता पुन्हा धावणार; धावपटू होण्याचं स्वप्न होणार साकार
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 11:16 PM

मुंबई :‘लहानग्या साक्षीचे धावपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने आवश्य प्रयत्न करावेत त्यासाठी तिला लागेल ती सर्व मदत करू’ असे उद्गगार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी काढले. निमित्त होतं ते साक्षीला नवीन अद्ययावत पाय बसवून देण्याचं. साक्षीची केईएम रुग्णालयात (KEM Hospital) भेट देऊन तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च स्वीकारत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं होतं. आज तिला नवीन पाय बसवून तिला पुन्हा तिच्या पायावर उभा करत त्यांनी दिलेला आपला शब्द पूर्ण केला आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात गतवर्षी झालेल्या प्रलयंकारी पावसात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.

बाळाला वाचवताना आले अपंगत्व

या दुर्घटनेवेळी आपला जीव धोक्यात घालून साक्षी दाभेकर (Sakshi Dabekar) या 14 वर्षांच्या मुलीने एका दोन महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवले होते. मात्र भिंत अंगावर कोसळल्याने साक्षीच्या पायाला जबर जखमी झाली होती. यावर उपचार करण्यासाठी तिला तातडीने मुंबईतील ‘केईएम’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला होता.

आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची

साक्षीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांच्या खर्च कसा करायचा? असा प्रश्न तिच्या कुटूंबियाना पडला होता.

साक्षीः धावपटू आणि कब्बडीपटू

साक्षी ही मुलगी धावपटू होती कब्बडी आणि खो-खो सारखे खेळ तालुकास्तरावर खेळत होती. पण तिला पाय गमवावा लागल्याने तिला कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी तिची ही व्यथा लोकांसमोर आणली. त्यानंतर या बातम्यांची दखल घेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तिची केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

श्रीकांत शिंदे फाउंडेशन मदत

तसेच तिच्यावरील उपचारांचा सर्व खर्च डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचे जाहीर केले. तसेच साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींचे शैक्षणिक पालकत्व देखील त्यांनी शिवसेनेच्यावतीने उचलत असल्याचे सांगितले होते.

‘जयपूर फूट’ बसवला

त्यानुसार आज साक्षीला मंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर बोलावून त्यांच्या समक्षच नवीन पाय बसवण्यात आला. याआधी केईएम रुग्णालयाने तिचा ‘जयपूर फूट’ बसवला होता. मात्र आता अधिक चांगल्या दर्जाचा पाय बसवण्यात आल्याने तिला चालणे, हालचाल करणे या गोष्टी अधिक चांगल्या रितीने करता येणे शक्य होणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी डॉ. अंकुश शेठ यांच्या मदतीने हा पाय साक्षीला लावून देण्यात आला.

स्वप्न पूर्ण करणार

यावेळी बोलताना साक्षीने हा नवीन पाय बसवल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. त्यासोबतच आता पुन्हा चांगल्या दर्जाचा पाय मिळाल्याने पुन्हा धावायला सुरुवात करून धावपटू बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले.

दाभेकर भगिनींच शैक्षणिक पालकत्व शिवसेनेकडे

साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींच शैक्षणिक पालकत्व देखील शिवसेनेने उचलले असल्याने त्यांच्या शिक्षणाला देखील लवकरच सुरुवात होईल. आज साक्षीला हा नवीन अद्ययावत पाय बसवला गेला असल्याने भविष्यात तिचे धावपटू होण्याचे स्वप्न ती नक्की पूर्ण करेल असा विश्वास मंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच दाभेकर भगिनींना लागेल ती सर्व मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. अंकुश शेठ साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनी आणि त्यांचे आप्तेष्ट तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील सर्व प्रमुख वैद्यकीय सहाय्यक आवर्जून उपस्थित होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.