राजकीय फायदा उचलण्यासाठी काही लोकांकडून मराठा आरक्षणाच्या विषयाचा विपर्यास; अशोक चव्हाणांच्या निशाण्यावर कोण?

मराठा आरक्षणाच्या विषयाचा काही लोक विपर्यास करत आहेत. काही जण याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमीतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

राजकीय फायदा उचलण्यासाठी काही लोकांकडून मराठा आरक्षणाच्या विषयाचा विपर्यास; अशोक चव्हाणांच्या निशाण्यावर कोण?
Ashok ChavanImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 5:09 PM

नांदेडः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. प्रश्न सुटला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरात घुसू असा इशारा दिल्यानंतर हा वाद आता काँग्रेसचे मंत्रा अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याने आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी छेडलेल्या उपोषणानंतर नांदेडमध्ये विकास कामांच्या उद्घघाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या विषयाचा काही लोक विपर्यास करत आहेत. काही जण याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमीतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मंत्री उदय सांमत आणि चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमध्ये आज काही विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मराठा आरक्षणाचा विषयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत कुणी काही म्हटले तरी काहीही होणार नाही असो टोलाही छत्रपती संभाजीराजे यांना त्यांनी लगावला. अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळे आणि आता आझाद मैदानावर संभाजी छत्रपती यांनी उपोषण पुकारल्यामुळेही मराठा क्रांती मोर्चा आता आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी अमरण उपोषण छेडल्यानंतर नांदेडमधील कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती सांगितली. यावेळी त्यांनी पत्रकारांनी छत्रपती संभाजी राजे राजकारण करताहेत का या प्रश्नावर त्यांनी मी यावर काय बोलणार नाही म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि ते बोलून घेतील असं म्हणून मराठा आरक्षणाच्या मुद्याचा चेंडू सरळ उद्धव ठाकरे यांच्याकडे भिरकावला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय वेगळी भूमिका मांडणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक झाला आहे, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने आता मुख्यमंत्रा उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

VIDEO: खासदार संभाजी छत्रपती यांच्या डोळ्यात अश्रू, तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

Maratha Reservation | छत्रपतींची तब्येत बिघडली; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला, पण राजे ठाम

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून 2 मार्चची तारीख, भुजबळ म्हणतात की…

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....