AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….म्हणून ‘सारथी’साठी माझा लढा ! यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित, संभाजी छत्रपतींचं ट्विट

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास संस्था पुणे म्हणजेच सारथी संस्थेमार्फत युपीएससीसाठी फेलोशिप दिलेल्या 21 विद्यार्थ्यांची युपीएससीत वर्णी लागली आहे.

....म्हणून 'सारथी'साठी माझा लढा ! यूपीएससी निकालातून 'सारथी'चे महत्त्व पुन्हा अधोरेखित, संभाजी छत्रपतींचं ट्विट
Sambhaji Chhatrapati
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 4:08 PM

मुंबई: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास संस्था पुणे म्हणजेच सारथी संस्थेमार्फत युपीएससीसाठी फेलोशिप दिलेल्या 21 विद्यार्थ्यांची युपीएससीत वर्णी लागली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. दिल्लीत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती. हाच धागा पकडत खासदार संभाजी छत्रपती यांनी सारथी संस्थेचं महत्व अधोरेखित करणारं ट्विट केलं आहे. ‘सारथी’ मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना UPSC सारख्या परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, हे यातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्था देखील महत्त्वाची आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. याचसाठी सारथी संस्थेच्या विकासाकरिता मी लढा देत आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

सारथी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करणार

सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. सारथी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा करणार सत्कार करणार आहे.

Sarathi UPSC selected candidate

सारथी यशस्वितांची यादी

सारथीद्वारे फेलोशिप घेऊन यशस्वी झालेले विद्यार्थी

विनायक कारभारी नरवाडे, गौरव रविंद्र साळुंखे, प्रतिक अशोक धुमाळ, प्रथमेश अरविंद राजशिके, आनंद अशोक पाटील, सागर भारत मिसाळ, सुरज भाऊसाहेब गुंजाळ, अनिल रामदास मस्के, अर्पिता अशोक ठुबे, अमोल सुरेशराव मुरकुट, अनिकेत अशोक फडतरे, राकेश महादेव अकोलकर, ओंकार मधुकर पवार, नितीन गंगाधर पुके, प्रणव विनोद ठाकरे , रणजीत मोहन यादव, माधुरी भानुदास गरुड, पूजा अशोक कदम, हर्षल भगवान घोगरे, रविराज हरिश्चंद्र वडक, सायली अशोक गायकवाड

सारथीचं महत्त्व अधोरेखित

खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करुन सारथीतर्फे फेलोशिप मिळवून प्रशिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. “….म्हणून ‘#सारथी’साठी माझा लढा ! ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले…!”, असं ट्विट खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं आहे. UPSC च्या जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झालेल्यांपैकी तब्बल २१ उमेदवार हे ‘सारथी’च्या योजनांचे लाभार्थी आहेत, असं संभाजी छत्रपती म्हणाले आहेत. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणा इतकीचं सारथी संस्था महत्त्वाची आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले. सारथी’ मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना UPSC सारख्या परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, हे यातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्था देखील महत्त्वाची आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. याचसाठी सारथी संस्थेच्या विकासाकरिता मी लढा देत आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

इतर बातम्या:

आधी 3 गुणांनी संधी हुकली, आता 466 रँक, कोणताही क्लास न लावता यवतमाळच्या श्रीकांत मोडकने करुन दाखवलं !

शाळेत असताना चहा, भजी विकली, आता क्लास वन ऑफिसर, बारामतीच्या अल्ताफ शेखचे घवघवीत यश !

Sambhaji Chhatrapati said for the progress of Maratha Samaj SARTHI is just as important as Reservation after UPSC Result

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...