समीर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊदच, पहिले सासरे म्हणाले, त्यांची मुलगी, जावईसुद्धा मुस्लिमच !
आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आलीय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे. त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा मुस्लिमच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मुंबई : मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. काल समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे. त्यानंतर आज मलिक यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना यांचा निकाहनामाच मलिक यांनी समोर आणला. त्यात समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. दरम्यान, वानखेडे यांच्याकडून आईच्या इच्छेसाठी आपण तो निकाह केला होता. त्यानंतर स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार विवाह केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आलीय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे. त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा मुस्लिमच असल्याचं त्यांनी म्हटलंय. (Sameer Wankhede’s father’s name Dawood, Wankhede’s first father-in-law’s reaction)
टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी आणि वानखेडे यांच्या पहिल्या सासऱ्यांमधील संवाद
प्रतिनिधी – नवाब मलिक म्हणाले की सुरुवातीला सांगितलं गेलं नव्हतं की, वानखेडे मुस्लिम आहेत. जे सर्टिफिकेट त्यांनी दाखवलं आहे ते कशा प्रकारचं सर्टिफिकेट आहे. तुम्हाला पहिल्यापासून माहिती होतं की त्यांचं नाव दाऊद आहे?
वानखेडेंचे पहिले सासरे – समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे हे माहिती होतं. सर्वांना माहिती होतं की ते मुस्लिम आहेत.
प्रतिनिधी – अच्छा, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून माहिती होतं की ते मुस्लिम आहेत?
वानखेडेंचे पहिले सासरे – हो
प्रतिनिधी – नवाब मलिक म्हणले की तुम्हाला सांगितलं गेलं नव्हतं.
वानखेडेंचे पहिले सासरे – ते पहिल्यापासून मुस्लिम होते. त्यांची मुलगी, जावईही मुस्लिम आहेत.
प्रतिनिधी – म्हणजे नवाब मलिक म्हणाले ते खरं आहे का? हे सफाई देत आहेत. पेपर्स दाखवत आहेत. ते बरोबर आहेत का?
वानखेडेंचे पहिले सासरे – हो ते सर्व बरोबर आहेत, त्यांनी मुस्लिम समजूनच निकाह केला होता.
निकाहवेळी ते समीर दाऊद वानखेडेच, मौलानांचाही दावा
समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या मौलानांनी खळबळजनक दावा केलाय. मुलगा आणि मुलगी दोघेही मुस्लिम असल्याचं सांगितल्यानेच आम्ही निकाह लावला, असं मौलाना मुजम्मिल अहमद यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. इतकंच नाही तर निकाहावेळी समीर वानखेडे यांनी आपलं नाव समीर दाऊद वानखेडे असंच सांगिंतलं होतं, असंही मौलाना म्हणाले.
निकाहावेळी समीर यांनी दाऊद असंच नाव घेतलं होतं. आम्ही मुलाला त्याचं पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसंच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात, असं मौलाना म्हणाले. त्याचबरोबर टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितल्याचंही ते म्हणाले. निकाहवेळी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितलं होतं. त्यावेळी ते दाऊदच बनले होते. त्यापूर्वी किंवा त्यानंतर त्यांचं नाव काय असेल ते आम्हाला काय माहिती, असंही मौलाना म्हणाले.
इतर बातम्या :
समीर वानखेडेंची तपास अधिकारी म्हणून उचलबांगडी होणार? NCB चे वरिष्ठ म्हणाले, तपास पुढे जाऊ द्या
Sameer Wankhede’s father’s name Dawood, Wankhede’s first father-in-law’s reaction